कोल्हापूर दिनांक 18 – केर्ली ता.करवीर येथे भोसले ग्राहक सेवा केंद्र बँक ऑफ बडोदा BC पॉईंट व कॅम्पुटर प्रशिक्षण केंद्र
याचे उद्घाटन केर्ली गावचे लोकप्रिय महिला सरपंच सौ. नीलम माने व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. धीरज रूकडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धीरज रुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच करवीरचे व केर्लेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच केर्ली गावाचे प्रमुख नागरिक यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
उद्घाटन सोहळ्यात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे करवीर कार्याध्यक्ष रामचंद्र माने,केर्ले शाखेचे अध्यक्ष संदीप गायकवाड उपाध्यक्ष फिरोज नायकवाडे, केर्ले शाखेचे सदस्य सचिन गोळे, मारुती माने, बाबासाहेब कांबळे, गौस नायकवाडे, अरिफ नायकवाडे, एकनाथ पोवार, राहुल खांडेकर, कृष्णात पेडेकर इत्यादी उपस्थित होते.सूत्रसंचालन मधुकर मांडवकर यांनी केले.
