
कोल्हापूर, दि. २० : राधानगरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या शासकीय वसतिगृहात अनुसूचित जाती/जमाती,अपंग, अनाथ,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त भटक्या जमाती,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश नोंदणी सुरू करण्यात आली आहे. वसतिगृहामध्ये माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक ए. जी. पाटील यांनी केले आहे.
या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून दरमहा निर्वाह,स्टेशनरी आणि गणवेश भत्ता तसेच छत्री व रेनकोट भत्ता दिला जातो.अद्ययावत संगणक कक्ष इंटरनेट सुविधेसह, सुसज्ज ग्रंथालय आणि इतर आवश्यक सुविधा ही मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
0000