Author: admin

कोल्हापूर दिनांक 18 – महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर च्या वतीने आज फायनान्स व बँकांच्या वसुली गुंडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडाका आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संयुक्त बैठकीची मागणी केलेली होती. मात्र केवळ पोलीस अधीक्षकांना एक पत्र पाठवून अशा प्रकारची कोणतीही बैठक न लावलेने मनसे कोल्हापूर तर्फे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावरती उतरून फायनान्सच्या वसुली गुंडांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सर्व बँका व फायनान्स कंपनीमध्ये घुसून त्यांच्या मॅनेजरना मनसे स्टाईलने दणका देण्यात आला. कायद्याने वसुली गुंडांना पाठवणे बेकायदेशीर असून केवळ नागरिकांना फोनवरून विचारणे व हप्ते तटल्यास…

Read More

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : भारतीय सेना मार्फत अग्निवीर अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिध्द झाली आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपीक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेडसमन 8 वी, अग्निवीर ट्रेडसिंग, 10 वी, महिला सहायक, सोलडी, 10 वी, अग्निवीर ट्रेडसमन, 10 वी, धार्मिक शिक्षक jco, हवालदार शिक्षण आणि हवालदार (सर्व्हेअर ऑटोमेटेड कार्टोग्राफर) यापदांसाठी दिनांक 10 एप्रिल 2025 पर्यंत www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र. जमीर करीम यांनी केले आहे.

Read More

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : शित्तूर तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथील भूमिपुत्र, कै. सुनिल गुजर (११० इंजिनियर रेजिमेंट, अरुणाचल प्रदेश) हे देशसेवेच्या कर्तव्यावर असताना दिनांक १३ मार्च रोजी शहीद झाले. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवरील काम सुरू असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांनी प्राण गमावले. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात झालेल्या या अंत्यविधीसाठी कुटुंबीय, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कै. सुनिल गुजर यांच्या सेवा आणि त्यागाला संपूर्ण गावाने अभिमानपूर्वक सलाम केला. त्यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली असून, कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण जिल्हा…

Read More

मुंबई : प्रतिनिधी प्रेरणा थिएटर्सचे भव्य दिव्य धमाल बालनाट्य “अंजू उडाली भुर्रर्रर्र” लवकरच बाल रसिकांचेच नाही तर पालकांचे आणि नातेवाईकांचेही मनोरंजन करण्यासाठी रंगभूमीवर दाखल होत आहे. १९ एप्रिल रोजी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे शुभारंभाचा प्रयोग होणार असून त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे बालनाट्य रसिकांचे मनोरंजन करत फिरणार आहे. श्री.अशोक पावसकर आणि सौ.चित्रा पावसकर हे गेली पन्नासहून अधिक वर्षे निस्वार्थीपणे बाल रंगभूमीची सेवा करणारे दाम्पत्य. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले. नावारूपाला आले. पावसकर दांपत्य डॉक्टर सलील सावंत ह्या तरुण निर्मात्याच्या साथीने अंजू उडाली भुर्र हे एक भव्य दिव्य बाल नाट्य प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गुरुवर्य…

Read More

मुंबई : प्रतिनिधी प्रेरणा थिएटर्सचे भव्य दिव्य धमाल बालनाट्य “अंजू उडाली भुर्रर्रर्र” लवकरच बाल रसिकांचेच नाही तर पालकांचे आणि नातेवाईकांचेही मनोरंजन करण्यासाठी रंगभूमीवर दाखल होत आहे. १९ एप्रिल रोजी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे शुभारंभाचा प्रयोग होणार असून त्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे बालनाट्य रसिकांचे मनोरंजन करत फिरणार आहे. श्री.अशोक पावसकर आणि सौ.चित्रा पावसकर हे गेली पन्नासहून अधिक वर्षे निस्वार्थीपणे बाल रंगभूमीची सेवा करणारे दाम्पत्य. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार तयार झाले. नावारूपाला आले. पावसकर दांपत्य डॉक्टर सलील सावंत ह्या तरुण निर्मात्याच्या साथीने अंजू उडाली भुर्र हे एक भव्य दिव्य बाल नाट्य प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. गुरुवर्य…

Read More

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या केएमए आर्ट सर्कल आणि केएमए कराओके क्लबच्या वतीने ” मिले सुर मेरा तुम्हारा ” या कराओके ट्रॅकवरील संगीत स्वर मेहफिलीचे आयोजन येत्या रविवारी २३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता गोविंदराव टेंबे सभागृह, देवल क्लब, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. हा नेहमीसारखा कराओके शो नसून व्हिडिओ कराओके शो आहे. ज्यात १६ फूट बाय १० फूट एलईडी स्क्रीनवर मूळ गाण्याचा चित्रफित दिसणार असून त्याला डॉक्टर कलाकार पार्श्वगायन देणार आहेत. कोल्हापुरात पहिल्यांदाच डॉक्टर कलाकार यामध्ये डॉ.उन्नती सबनीस,डॉ. सचिन व डॉ दीपा फिरके, डॉ.संजय घोटणे, डॉ. संगीता निंबाळकर डॉ. प्रिया शहा सौ बीना अपराध, डॉ पी एम…

Read More

कोल्हापूर ( जिमाका ) दि :15 कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर असणाऱ्या बालिंगा ते दोनवडे या दोन गावांमध्ये पंचगंगा नदीवरील प्रस्तावित पुलाच्या दोन्ही बाजूच्या भरावामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पुर परिस्थितीच्या अनुषंगाने या महामार्गावरील स्थानिकांच्या समस्यांचे निवारण करून बालिंगा पुलाचे काम करावे तसेच पावसाळ्यात या परिसरातील लोकांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली . जिल्हाधिकारी कार्यालयात या पुलाच्या आढाव्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी ते बोलत होते . यावेळी आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे , नॅशनल हायवेचे अधीक्षक अभियंता दयानंद विभुते ,जलसंपदाचे अधिक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे ,कार्यकारी अभियंता…

Read More

कोल्हापूर (जिमाका) दि : 15 मौजे सांगरूळच्या ग्रामस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही . सांगरूळ गायरान जमिनीच्या अनुषंगाने शासनस्तरावर आढावा घेवून सामोपचाराने निश्चितपणाने तोडगा काढू अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली .जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे सांगरूळ गायरान प्रश्नाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती . यावेळी आ. चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे , निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद ,कृषी अधीक्षक जालिंदर पांगारे , जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत ) अरुण जाधव , करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक , करवीर गटविकास अधिकारी श्रीमती दिपाली पाटील , गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे, सांगरूळच्या सरपंच श्रीमती शितल खाडे आदी उपस्थित…

Read More

कोल्हापूर दिनांक 15 – व्यवसाय हा कोल्हापुरकरांच्या नसानसात नेहमीच भिनलेला असतो.अशाच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या राजारामपुरी कोल्हापूर मधील बालाजी गारमेंटचे सर्वेसर्वा अजातशत्रू प्रशांत पोकळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित सामाजिक राजकीय स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रशांत पोकळे हा कोल्हापूरचा उमदा तरुण 1998 च्या सुमारास रेडीमेड गारमेंट व्यवसायात उतरण्याचे स्वप्न उराशी बाळगून राजारामपुरी येथील 5 व्या गल्लीत एका छोट्याशा गाळ्यात सुरवात करतो.मृदुभाषिक,उत्तम संवाद कौशल्य,दांडगा जनसंपर्क आणि मोठा मित्रपरिवार यांच्या जोरावर बालाजी गारमेंट ची मुहूर्तमेढ प्रशांत यांनी रोवली.अल्पावधीतच उत्कृष्ट दर्जाच्या आणि ब्रँडेड कपड्यांमुळे “बालाजी” ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागले.त्यानंतर प्रशांत यांनी मागे वळून पाहिले नाही.विविध चांगल्या दर्जाच्या कपड्यांसाठी संपूर्ण भारत पिंजून काढला…

Read More

कोल्हापूर: किडनीच्या आरोग्याविषयी जनजागृती व त्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक किडनी दिनानिमित्त लोकांमध्ये याबद्दल माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी गुरुवारी, १३ मार्च रोजी कोल्हापुरातील किडनी विकार तज्ज्ञांच्या डेक्कन नेफ्रोलॉजि सोसायटी व विविध संस्थांच्यावतीने सायकल रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. रॅलीला कोल्हापूरमधील अनेक नामांकित डॉक्टर तसेच परिचारिका विविध संस्थांचे पदाधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, मित्र परिवार व अन्य सायकल स्वारांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. सायकल रॅलीच्या माध्यामतून निरोगी आरोग्याविषयी व किडनी विषयी जनजागृती करण्यात आली. ‘भरपूर पाणी प्या, किडनी निरोगी ठेवा’, व्यायाम करा, निरोगी राहा, ‘सायकल चालवा, निरोगी राहा’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. मा. श्री. राहुल रॊकडे…

Read More