कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या केएमए आर्ट सर्कल आणि केएमए कराओके क्लबच्या वतीने ” मिले सुर मेरा तुम्हारा ” या कराओके ट्रॅकवरील संगीत स्वर मेहफिलीचे आयोजन येत्या रविवारी २३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता गोविंदराव टेंबे सभागृह, देवल क्लब, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.
हा नेहमीसारखा कराओके शो नसून व्हिडिओ कराओके शो आहे. ज्यात १६ फूट बाय १० फूट एलईडी स्क्रीनवर मूळ गाण्याचा चित्रफित दिसणार असून त्याला डॉक्टर कलाकार पार्श्वगायन देणार आहेत.
कोल्हापुरात पहिल्यांदाच डॉक्टर कलाकार यामध्ये डॉ.उन्नती सबनीस,डॉ. सचिन व डॉ दीपा फिरके, डॉ.संजय घोटणे, डॉ. संगीता निंबाळकर डॉ. प्रिया शहा सौ बीना अपराध, डॉ पी एम चौगुले डॉ रेणू आडनाईक, डॉ माधुरी कुलकर्णी, डॉ अनघा कुलकर्णी, डॉ अरुण व डॉ अनिता परीतेकर , डॉ मिलिंद तिवले , डॉ मनिषा कुलकर्णी, डॉ मंदार पाटील, डॉ शिरीष व सौ अनिता पाटील, डॉ महेंद्र व डॉ वैशाली कानडे, डॉ अश्विनी पाटील, डॉ चित्तरंजन कदम, डॉ अनिता सोनवणे, सौ प्रीती चिंचणीकर, डॉ शीतल पाटील, डॉ मैना शिंदे, डॉ सुहास कोठावळे हे सर्व डॉक्टर ही संगीत मैफिल सादर करत आहेत. यासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे. तरी कोल्हापुरातील रसिक प्रेक्षकांनी या संगीत मैफिलीचां आनंद घ्यावा असे असे आवाहन केएमए आर्ट सर्कल व केएमए कराओके क्लबचे प्रमुख डॉ. राजेंद्र वायचळ ,कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर व आर्ट सर्कल समन्वक डॉ. आबासाहेब शिर्के यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
