कोल्हापूर: किडनीच्या आरोग्याविषयी जनजागृती व त्याचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक किडनी दिनानिमित्त लोकांमध्ये याबद्दल माहिती व्हावी, लक्षणे व उपचाराची माहिती व्हावी, यासाठी गुरुवारी, १३ मार्च रोजी कोल्हापुरातील किडनी विकार तज्ज्ञांच्या डेक्कन नेफ्रोलॉजि सोसायटी व विविध संस्थांच्यावतीने सायकल रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. रॅलीला कोल्हापूरमधील अनेक नामांकित डॉक्टर तसेच परिचारिका विविध संस्थांचे पदाधिकारी व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, मित्र परिवार व अन्य सायकल स्वारांनी मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. सायकल रॅलीच्या माध्यामतून निरोगी आरोग्याविषयी व किडनी विषयी जनजागृती करण्यात आली. ‘भरपूर पाणी प्या, किडनी निरोगी ठेवा’, व्यायाम करा, निरोगी राहा, ‘सायकल चालवा, निरोगी राहा’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. मा. श्री. राहुल रॊकडे (अतिरिक्त आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका) डॉ अजित जोशी,डॉ अमोल कोडोलीकर यांच्या हस्ते रॅली चे फ्लॅग ऑफ करण्यात आले.
रॅलीचा मार्ग: दसरा चौक – व्हिनस कॉर्नर – दाभोलकर कॉर्नर – छ. ताराराणी चौक – धैर्यप्रसाद हॉल – पोलीस ग्राउंड – मेरि वेदर ग्राउंड – महावीर कॉलेज –
खानविलकर पेट्रोल पंप – जैन बोर्डिंग येथे समाप्त (अल्पोहार व प्रमाणपत्र देऊन समाप्त)
याप्रसंगी या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर किडनी बद्दल माहिती मार्गदर्शन केले. किडनीचे आरोग्य आणि प्रतिबंधाचे महत्त्व याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी व निरोगी जीवनशैली आणि चांगल्या हायड्रेशन पद्धतींचा प्रचार करण्यासाठी अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर शहरातील नामवंत डॉक्टरांसोबत सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्याची उत्तम संधी यावेळी उपस्थितांना मिळाली.
असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, कोल्हापूर, कोल्हापूर युरॉलॉजिकल सोसायटी, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, केडीजीपीए, एनआईएमए, एनआईएचए, जीपीए यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच रननिती क्लब यांनी रॅलीचे पूर्ण नियोजन पाहिले.
