कोल्हापूर दिनांक 15 – व्यवसाय हा कोल्हापुरकरांच्या नसानसात नेहमीच भिनलेला असतो.अशाच शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या राजारामपुरी कोल्हापूर मधील बालाजी गारमेंटचे सर्वेसर्वा अजातशत्रू प्रशांत पोकळे यांचा आज वाढदिवस त्यानिमित सामाजिक राजकीय स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रशांत पोकळे हा कोल्हापूरचा उमदा तरुण 1998 च्या सुमारास रेडीमेड गारमेंट व्यवसायात उतरण्याचे स्वप्न उराशी बाळगून राजारामपुरी येथील 5 व्या गल्लीत एका छोट्याशा गाळ्यात सुरवात करतो.मृदुभाषिक,उत्तम संवाद कौशल्य,दांडगा जनसंपर्क आणि मोठा मित्रपरिवार यांच्या जोरावर बालाजी गारमेंट ची मुहूर्तमेढ प्रशांत यांनी रोवली.अल्पावधीतच उत्कृष्ट दर्जाच्या आणि ब्रँडेड कपड्यांमुळे “बालाजी” ग्राहकांच्या पसंतीस उतरू लागले.त्यानंतर प्रशांत यांनी मागे वळून पाहिले नाही.विविध चांगल्या दर्जाच्या कपड्यांसाठी संपूर्ण भारत पिंजून काढला अन् दर्जात्मक कपडे आपल्या ग्राहकांना उपलब्ध केले.काही वर्षातच राजारामपुरी मधील 8 व्या गल्लीत भव्य असे “बालाजी गारमेंट” चे शोरुम बघता बघता उभे राहिले आणि सुरू झाला प्रशांत यांचा खरा प्रवास.जिकडे तिकडे बालाजी चा कौटुंबिक चाहता वर्ग तयार होऊ लागला लग्न सराई असो की अन्य कोणताही कार्यक्रम खरेदी म्हटले की बालाजी असे समीकरण तयार झाले.त्यानंतर प्रशांत यांनी केवळ व्यवसाय न करता आपणही या समाजाचे देणे लागतो या सामाजिक भावनेतून त्यांनी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना पाठबळ द्यायला सुरवात केली. मग तो उपक्रम दहीहंडी चा असो अथवा अन्य कोणताही.विविध सामाजिक आणि राजकीय नेत्यांसोबत त्यांची ऊठबस होऊ लागली.राजकारणात सुद्धा त्यांचा प्रचंड मोठा मित्र परिवार असल्याने त्यांनी आपले सर्वांगी व्यक्तिमत्व उभा केले.आज कोल्हापुरात कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाला स्टेजवर मंत्री,आमदार खासदार यांच्यासोबत प्रशांत दिसणारच.यातूनच त्यांची कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालक पदी आणि देशपातळीवरील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गारमेंट अँड फॅब्रिक उपाध्यक्षपदी वर्णी लागली.त्यामुळे बालाजी गारमेंट हा देशपातळीवरील ब्रँड बनला आहे.सर्वसामान्य गोरगरीब आणि गरजूंना प्रशांत नेहमीच मदत करताना दिसतात.अलीकडेच कोविड काळात त्यांनी सुमारे 470 मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.त्याचबरोबर 1000 रुग्णांना कोविड किट वितरण करत या संकटात समाजाच्या मदतीला प्रशांत धावून आले आहेत.त्यामुळे त्यांच्याकडे मदतीसाठी गेलेला माणूस रिकाम्या हातानी कधी परत जात नाही.या सर्व प्रवासात त्यांना त्यांचे भाऊ प्रकाश आणि प्रकाश यांचे मेहुणे मनीष यांची अखंड साथ मिळाली.गारमेंट व्यवसायातील असणारे त्यांचे प्रचंड ज्ञान या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना निश्चितच प्रेरणादायी असेल.
तसेच बालाजी ग्रुप आता इतर क्षेत्रात यशस्वीपणे उतरला असून त्यामध्ये बांधकाम व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली आहे.त्यामुळे आज त्यांच्या वाढ दिनानिमित्त “बालाजी गारमेंट – प्रशांत पोकळे Not Only Name It’s A Brand” ची चर्चा रंगताना दिसत आहे.त्यामुळे प्रशांत यांची येणाऱ्या काळात राजकारणात एन्ट्री होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
