कोल्हापूर दिनांक 18 – महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर च्या वतीने आज फायनान्स व बँकांच्या वसुली गुंडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडाका आंदोलन छेडण्यात आले.
आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संयुक्त बैठकीची मागणी केलेली होती. मात्र केवळ पोलीस अधीक्षकांना एक पत्र पाठवून अशा प्रकारची कोणतीही बैठक न लावलेने मनसे कोल्हापूर तर्फे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावरती उतरून फायनान्सच्या वसुली गुंडांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सर्व बँका व फायनान्स कंपनीमध्ये घुसून त्यांच्या मॅनेजरना मनसे स्टाईलने दणका देण्यात आला.
कायद्याने वसुली गुंडांना पाठवणे बेकायदेशीर असून केवळ नागरिकांना फोनवरून विचारणे व हप्ते तटल्यास त्यांना नोटीस पाठवून वसुली करणे अशी पद्धत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भाडोत्री गुंडांना हाताशी धरून माता-भगिनींना घरातून बाहेर काढून त्यांच्याशी असभ्यवर्तन करणाऱ्या गुंडांना ठेचण्यासाठी मनसेने आज पहिलं पाऊल उचललं .
रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या नियमानुसार ज्या त्या राज्यातील प्रादेशिक भाषेमध्ये व्यवहार करणे गरजेचे असताना सर्वसामान्य नागरिकांना जास्त समजत नसलेल्या व अत्यंत कमी फॉन्ट साईजचे इंग्रजी भाषेमधील वाचता न येणाऱ्या फॉर्म्स वरती सह्या घेऊन खाजगी सावकारापेक्षा दहा पटीने व्याज वसूल करणाऱ्या , लोकांच्या घरात घुसून माता-भगिनींना दंडाला धरून बाहेर काढून त्यांना अपशब्द वापरून अश्लील पद्धतीने शिवीगाळ करून कायद्याचा राजरोस भंग करणाऱ्या फायनान्सच्या वसुली गुंडांना इथून पुढे वसुली करू न देण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आंदोलकांनी व्यक्त केला.
तसेच इथून पुढे सर्व बँका व फायनान्स कंपनीच्या वसुली गुंडांचा जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी 9371725115 , 9370071106 , या क्रमांक वरती संपर्क साधण्याचे आवाहन मनसे कोल्हापूर तर्फे करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केले. या आंदोलनामध्ये जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा , अमित पाटील , तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील , विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, जिल्हा सचिव निलेश आजगावकर , तालुका उपाध्यक्ष संजय चौगुले , विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे , तालुका उपाध्यक्ष राहुल पाटील , शहर सचिव यतीन होरणे , शहर उपाध्यक्ष सुरज कानगुडे, उत्तम वंदुरे , अरविंद कांबळे , अमर माने, शरद जाधव, राहुल पाटील, मोहसीन मुलाणी, सुधीर कोठावळे, तेजस शिंदे, संदीप खाडे, अमित बंगे, प्रवीण जाधव, गौरव मिसाळ, नितेश गणेशाचार्य, निलेश पाटील, अनिकेत पाटील, अमित साळोखे, गणेश सांगवडे, सरदार कांबळे, रोहित कांबळे, राहुल खाडे, विकी पाहुजा, तेजस राख, राजन हुल्लोळी , सचिन पाटील, दिलीप पाटील, ऋषिकेश सुतार, गणेश तेरवाडे , नुरुद्दीन जमादार इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.