कोल्हापूर दिनांक 27- मराठा क्रांती मोर्चातील अमूल्य योगदानाची दखल घेत, सागर धनवडे यांची आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे,डॉ.कृषीराज टकले पाटील यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
या नियुक्तीबद्दल बोलताना राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य भूषण मराठा रत्न डॉ.सागर काळे यांनी विश्वास व्यक्त केला की, सागर धनवडे यांच्या अनुभवामुळे संघटनेला मोठी ताकद मिळेल. याप्रसंगी राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय सचिव चैतन्य रावल, राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल, राष्ट्र स्वाभिमानी इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष इतिहास संशोधक रवींद्र राजे जगदाळे, राष्ट्र स्वाभिमानी इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष इंद्रजित घोरपडे गजेंद्रगडकर हिंदुराव, राष्ट्र स्वाभिमानी इतिहास आघाडी राष्ट्रीय सचिव लेखिका सुवर्णा ताई निंबाळकर, राष्ट्र स्वाभिमानी इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय सचिव उज्ज्वल सिंह गायकवाड, राष्ट्र स्वाभिमानी अधिवक्ता मंच आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रितपाल सिंह आणि राष्ट्र स्वाभिमानी महिला आघाडी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्वेता राज सिंह, महिला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशंभू जांभळे, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्र स्वाभिमानी कोकिळा पवार यांनी आनंद व्यक्त केला.तसेच, राष्ट्र स्वाभिमानी इतिहास आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सरलष्कर महेंद्र नाईक निंबाळकर, राष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक भानुदास वाबळे पाटील यांच्यासह संघटनेच्या २० राज्यातील सर्व प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय कार्यकारिणीने सागर धनवडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
