Author: admin

कोल्हापूर/आजरा, दि. १३ (जिमाका): आजरा तालुक्यातील जंगली हत्तींचा वावर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान हा अनेक वर्षांपासूनचा चिंतेचा विषय आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आजरा तालुक्यात लवकरच ‘हत्ती संगोपन केंद्र’ (हत्ती कॅम्प) उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथे जलसंधारण विभागाच्या तलावात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बोटिंग प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. घाटकरवाडी आणि परिसरातील गावांमध्ये जंगली हत्तींकडून शेतीचे सातत्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या पार्श्वभूमीवर, स्थानिक गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या गंभीर प्रश्नाबाबत निवेदन दिले. जोपर्यंत हत्ती संगोपन केंद्र…

Read More

कोल्हापूर, दि. १३ (जिमाका) : पाय चिखलात… हातात भाताची रोपे आणि सोबत शेतकरी व अधिकारी… पन्हाळा तालुक्यातील बांदिवडे येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी स्वतः शेतात उतरून चिखलणी केली आणि चारसूत्री पद्धतीने भाताची रोपे लावली. निमित्त होते जिल्हा प्रशासनाच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमाचे. दिवसभर शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत त्यांनी शेतीतील प्रयोग पाहिले, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि सेंद्रिय शेतीपासून आधुनिक एआय तंत्रज्ञानापर्यंत विविध विषयांवर त्यांच्याशी थेट संवाद साधला. सन २०२६-२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पन्हाळा तालुक्यातील केखले आणि बांदिवडे या गावांची निवड केली. केवळ कार्यालयीन स्तरावर शेतीविषयक माहिती घेण्याऐवजी प्रत्यक्ष शिवारात जाऊन शेतकऱ्यांचे अनुभव, अडचणी आणि…

Read More

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात आज अखेर 5.30 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. दुपारी 4 वा.च्या पाणी पातळी अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील- रुई, इचलकरंजी व शिरोळ, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व बाचणी असे एकूण 5 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील धरणांमधील सद्य स्थितीतील पाणीसाठा पुढीलप्रमाणे :- राधानगरी 5.30, तुळशी 1.99, वारणा 20.81, दूधगंगा 8.11,कासारी 1.56,कडवी 1.45, कुंभी 1.40,पाटगाव 1.79, चिकोत्रा 0.61,चित्री 1.10, जंगमहट्टी 0.84, घटप्रभा 1.45 ,जांबरे 0.80,आंबेआहोळ 0.93, सर्फनाला 0.59 तर धामणी येथे 1.29 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे :- राजाराम 13.5 फूट, सुर्वे 16.6, रुई 42.10, इचलकरंजी 39.9, तेरवाड…

Read More

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : खरीप हंगाम 2026-27 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्ह्यातील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी केले. खरीप हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात भात, ज्वारी, नाचणी, भुईमूग व सोयाबीन या अधिसूचित पिकांसाठी ही योजना लागू आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. खातेदार शेतकऱ्यांबरोबरच कुळाने अथवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेत सहभागी होण्यासाठी महत्त्वाच्या अटी- शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य आहे. पीक…

Read More

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 18 जुलै रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 12 उद्योजकांकडून 538 पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आलेली आहेत. या पदांकरीता किमान 8 ते 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा, बी.टेक तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच स्वयंरोजगार करू इच्छ‍िणाऱ्या उमेदवारांकरीता व‍िव‍िध प्रकारची महामंडळे उदा. अण्णासाहेब पाटील…

Read More

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथील महासैनिक दरबार हॉलच्या परिसरातील पडसर जमीनीतील गवताची सन 2026 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीरांनी प्रत्यक्ष पहाणी करुन आपली दरपत्रके सिलबंद लिफाफ्यासह 17 जुले रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावीत. प्राप्त सिलबंद लिफाफ्यातील जास्तीत जास्त रक्कम असणा-या दरपत्रकास मान्यता देण्यात येईल. याबाबतच्या अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0231-2665812 किंवा व्हॉटसअप क्र. 9172035612 वर संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले. 0000

Read More

कोल्हापूर/आजरा, दि.२३ : बळीराजाच्या अडीअडचणी आणि शेतीचे प्रश्न थेट बांधावर जाऊन समजून घेण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज एक आगळावेगळा पुढाकार घेतला. ‘एक दिवस बळीराजासाठी’ या विशेष उपक्रमांतर्गत आजरा तालुक्यातील मसोली येथे चिखलात उतरून पालकमंत्र्यांनी स्वतः रोटावेटर चालवत चिखलणी केली, तसेच पारंपरिक पद्धतीने भात रोपलावणी व बांधबंदिस्तीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग घेतला. पालकमंत्र्यांच्या या उपक्रमामुळे आज विविध लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी जिल्ह्यातील तब्बल ३०० गावांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते. जिल्ह्यात सध्या पावसाळी हंगामातील भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात असून, लावणीला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मसोली येथील शेतकरी सुरेश होडगे यांच्या शेताला भेट दिली. केवळ औपचारिक…

Read More

कोल्हापूर दिनांक 13 – कोल्हापुर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील अवैध वेश्य व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणे बाबत सुचना दिल्या आहेत. त्याअनुशंघाने करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी करवीर पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शोध पथकाकडील अंमलदारांना करवीर तालुक्यातील अवैध वेश्याव्यवसाय सुरु असणारे लॉजिंगची माहिती काढुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदाराकरवी बातमी मिळाली की, वाशी गावचे हद्दीतील सनराईज लॉजींग येथे हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरु आहे,त्यासाठी लॉजचालकाने पुणे मुंबई येथुन महिला आणुन व्हॉट्सअॅप द्वारे ग्रुप बनवुन त्या ग्रुपवर वेश्या व्यवसाया करीता आणलेल्या पिडीत महीलांचे…

Read More

कोल्हापूर दि 11 (जिमाका) शहरामध्ये शेंडा पार्क येथे वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे उभारण्यात येत असलेल्या ११०० बेड,६०० जनरल बेड,२५० कॅन्सर आणि २५० सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचं बांधकाम हे अतिशय दर्जेदार व गुणवत्तापूर्वकच होईल यात शंका नाही. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याची त्रयस्थ एजन्सीमार्फत तपासणी केली जाईल. त्या तपासणीनंतरच संबंधिताना बिल अदा केले जाईल, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली . कोल्हापुरातील काही माध्यमांमध्ये शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या कामांमध्ये त्रुटी असल्याचे वृत्त प्रसारीत झाले होते . त्या पार्श्वभूमीवर मंत्री श्री मुश्रीफ यांनी संबंधित बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली. या पहाणीनंतर बोलताना मुश्रीफ…

Read More

कोल्हापूर, दि. ११ (जिमाका) : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर यांचे वतीने १०ते १८ जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसेच देश-विदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य सप्ताहाची सुरुवात १० जुलै रोजी ज्ञानगंगा एज्युकेशन, जवाहरनगर येथे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) नोंदणी व मार्गदर्शन सत्राने झाली. १३ जुलै रोजी न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे AI मधील संधी’या विषयावर आयटी तज्ज्ञ स्वप्निल इंगवले मार्गदर्शन करणार आहेत. १४ जुलै रोजी सुपर कॉम्प्युटर एज्युकेशन,…

Read More