कोल्हापूर दिनांक 13 – कोल्हापुर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील अवैध वेश्य व्यवसायाचे समूळ उच्चाटन करणे बाबत सुचना दिल्या आहेत. त्याअनुशंघाने करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी करवीर पोलीस ठाणे कडील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शोध पथकाकडील अंमलदारांना करवीर तालुक्यातील अवैध वेश्याव्यवसाय सुरु असणारे लॉजिंगची माहिती काढुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार करवीर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदाराकरवी बातमी मिळाली की, वाशी गावचे हद्दीतील सनराईज लॉजींग येथे हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरु आहे,त्यासाठी
लॉजचालकाने पुणे मुंबई येथुन महिला आणुन व्हॉट्सअॅप द्वारे ग्रुप बनवुन त्या ग्रुपवर वेश्या व्यवसाया करीता आणलेल्या पिडीत महीलांचे फोटो पाठवुन कोल्हापुरातील पांढरपेशा व्यक्तिंना भुरळ घालुन कुंटणखाना चालवत असलेबाबत गोपनीय बातमीदाराकरवी बातमी मिळालेने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे पथकाने बोगस गि-हाईक पाठवुन दिनांक ११/०७/२०२६ रोजी छापा कारवाई केली आहे. सदर ठिकाणी १) सागर प्रभाकर कांबळे वय ४० रा. मिनचे बुद्रुक ता. भुदरगड जि. कोल्हापूर, २) कमलेश कृष्णा पाटील वय ३५, रा. हेळेवाडी ता. राधानगरी जि. कोल्हापुर हे मिळुन आले त्यांचेकडे विचारणा केली असता लॉजचालक ३) शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील रा. हेदवडे ता. भुदरगड जि. कोल्हापूर व त्याचे सहकारी ४) सुहास निचीते रा सोळांकुर ता. राधानगरी, ५) विक्रम दिनकर कांबळे रा. कासारवाडा ता. राधानगरी हे मिळुन आले नाहीत. सदर ठिकाणी वेश्याव्यवसाया करीता आणलेली एक पिडीत महिलेची सुटका करण्यात आलेली आहे. त्यावेळी एकुण ६,९००/-रु. किंमतीचे रोख रक्कम, ४ मोबाईल, निरोध पॅकेट्स १ व एक बॉक्स त्यामध्ये ७२ निरोध पोकीटे, रजिस्टर, भाडे करार इत्यादी साहित्य जप्त करणेत आलेले आहे. नमुद कारवाई मधील आरोपी सागर प्रभाकर कांबळे याचेकडे विचारपुस करुन चौकशी करता आरोपी शहाजी एकनाथ वैद्य उर्फ सागर पाटील याने ” सागर पाटील फ्रेंड सर्कल ” या नावाने व्हाट्सअॅप ग्रुप काढुन व्हाट्सॲप ग्रुप मधील सदस्यांशी संपर्क करून सुहास निचीते व विक्रम दिनकर कांबळे यांचे मदतीने सनराईज लॉजमध्ये बोलावुन येणारे ग्राहकाकडुन कॅश किंवा ऑनलाईन स्वरुपात पैसे स्विकारुन हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय चालवत असलेचे निष्पन्न झाले आहे.सदर बाबत करवीर पोलीस ठाणेस पोलीस उप निरीक्षक सुहास पवार यांनी फिर्याद दिलेने गुन्हा रजि नंबर ३८६/२०२६ भा. न्या. सं. कलम १४३ (२) व अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.सदर कारवाई कोल्हापुर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर पोलीस अधिक्षक अण्णसाहेब जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी, अप्पासो पवार यांचे मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाणेकडील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व पोसई सुहास पवार, सहा फौजदार राहुल देसाई पो.हे.कॉ.विजय तळसकर,महिला पो.हे.कॉ बेगम गडकरी, म.पो.हे.कॉ अमृता सोनुले, पो कॉ अविनाश कांबळे, यांचे समवेत केलेली आहे.
