
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथील महासैनिक दरबार हॉलच्या परिसरातील पडसर जमीनीतील गवताची सन 2026 करीता विक्री करण्यात येणार आहे. इच्छुक खरेदीरांनी प्रत्यक्ष पहाणी करुन आपली दरपत्रके सिलबंद लिफाफ्यासह 17 जुले रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावीत.
प्राप्त सिलबंद लिफाफ्यातील जास्तीत जास्त रक्कम असणा-या दरपत्रकास मान्यता देण्यात येईल. याबाबतच्या अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 0231-2665812 किंवा व्हॉटसअप क्र. 9172035612 वर संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले.
0000