Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना (मधुमक्षिकापालन) 18 जुन 2019 पासून राज्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्ती तसेच संस्थांकडून योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात येत असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी तसेच संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस.पी. जौंजाळ यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष/छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी संदर्भात माहिती दिली जाते. या योजनेअंतर्गत वैयक्तीक मधपाळ घटकांसाठी अर्जदार हा साक्षर असावा, त्याची स्वतःची शेती…
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज व नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर 15 मे ते 31 जुलै या कालावधीत अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर सादर करणे आवश्यक असून, प्रत्यक्ष किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ‘सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन (Most Outstanding Person with Disabilities)’, ‘श्रेष्ठ दिव्यांगजन (Outstanding Person with Disabilities)’ आणि ‘श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक/बालिका (Outstanding Creative Divyang Child)’ या उपवर्गांसाठी यूडीआयडी (UDID)…
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे. जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकीरता पात्रता निकष खालीलप्रमाणे- इंडिया स्किल कॉम्पीटिशन 2026-27 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 63 क्षेत्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी 56 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी, 2003 किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Cyber Security, Industry Skill 4.0, Mechatronics, Robot Systems Integration, या Team स्किल्सकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी, 2003 आणि Autonomous Mobile या स्किलकरिता जन्म 1…
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगिण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येतात. सन 2026-27 साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. योजनेसंदर्भातील नियम, अटीं व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध (download) करुन घ्यावा. सन 2026-27 साठीच्या समान निधी योजना (Matching Schemes)- इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना – 25.00 लाख रु.,…
कोल्हापूर, दि. २० : आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाने ऑगस्टअखेर पुनर्वसनासंदर्भातील सर्व बैठका घेऊन आवश्यक निर्णय व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्यात, तसेच सप्टेंबरअखेर प्रत्यक्ष पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश दिले. पाटबंधारे, पुनर्वसन आणि महसूल अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशांनुसार, आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील सर्व प्रकल्पग्रस्तांना न्याय देत सप्टेंबरअखेर पुनर्वसनाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारसंघातील विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, समरजितसिंह घाटगे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे,…
कोल्हापूर, दि. १८ : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी होते. आमदार अमल महाडिक, विजय जाधव, रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष तथा समन्वयक संजय पेंडसे, राजवर्धन जगदाळे, भरत सोमैय्या, हरिश्चंद्र धोत्रे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी युवराज पाटील, आयटीआयचे प्राचार्य महेश आवटे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार…
पर्यटकांसाठी सात धबधब्यांसह झिप लाईन, साहसी खेळ, चिल्ड्रेन्स पार्क आणि नव्या पर्यटन सुविधांची मेजवानी कोल्हापूर, दि. १८ : कोल्हापूर वन विभागांतर्गत गारगोटी वनपरिक्षेत्रातील सवतकडा धबधबा परिसरात पर्यटन विकासासाठी ‘वनपर्यटन राज्य योजना’ आणि ‘स्टेट इको-टुरिझम’ या निधीतून उभारण्यात आलेल्या विविध आधुनिक सुविधांचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. निसर्ग पर्यटनाला साहसी पर्यटनाची जोड देत पर्यटकांसाठी झिप लाईन, विविध एडव्हेंचर स्पोर्ट्स, चिल्ड्रेन्स पार्क, सोव्हेनिअर शॉप तसेच इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सवतकडा परिसराच्या पर्यटन विकासाला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या सोव्हेनिअर शॉपचेही…
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना शेंडा पार्कमधील बैठकीत घेतला कामाच्या प्रगतीचा आढावा कोल्हापूर, दि. १८ : मौजे सांगाव येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय तसेच कागल येथील ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभाराव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. पाणी, वीज, रस्ते आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत विशेष सतर्कता बाळगून आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील राजर्षी छत्रपती…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 साठी नामांकन अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभारून रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजकांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. 13 जुलै 2026 पासून पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून इच्छुक उद्योजकांनी आपले नामांकन अर्ज 28 जुलै पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. पी. जौंजाळ यांनी केले आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष असून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार देवून यशस्वी उद्योजकांचा सन्मान करण्यात येणार आहे. ग्रामीण उद्योगांना चालना मिळावी, नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन मिळावे…
• नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत पोलिसांकडून 124 गुन्हे दाखल • गोपनीय माहिती देण्यासाठी 9822766100 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन • #नशामुक्तकोल्हापूर हा असेल अधिकृत सोशल मीडिया हॅशटॅग कोल्हापूर, दि. 17 : जिल्ह्यात ‘नशामुक्त कोल्हापूर’ अभियानांतर्गत प्रत्येक स्तरावर जनजागृतीसह विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत पोलिस विभागाने आतापर्यंत 124 गुन्हे दाखल करून सुमारे 84 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच, येत्या 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये नशामुक्तीचे ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन…