
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी होते. ही जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळासारखीच आहे.
जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेकीरता पात्रता निकष खालीलप्रमाणे- इंडिया स्किल कॉम्पीटिशन 2026-27 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष आहे, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 63 क्षेत्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. त्यापैकी 56 क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी, 2003 किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Cyber Security, Industry Skill 4.0, Mechatronics, Robot Systems Integration, या Team स्किल्सकरिता उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी, 2003 आणि Autonomous Mobile या स्किलकरिता जन्म 1 जानेवारी, 2006 किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे.
तसेच आयोजित इंडिया स्किल कॉम्पीटिशन 2026-27 जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरीता सर्व खाजगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पॉलिटेक्निक्स, इंजिनियरींग कॉलेज, हॉस्पिटॅलिटी इन्स्टीट्युट, IIT, CIPET, Corporate Technical Institute, Skill Training Centers, Fine Arts College, Flower Training Institute, Institute of Jewellery Making, प्रशिक्षण संस्था, सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. स्पर्धेकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर भेट देवून जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, कावळा नाका, कोल्हापूर (दूरध्वनी क्र. 0231-2545677) येथे संपर्क साधावा.
0000