Author: admin

कोल्हापूर, दि. ११ (जिमाका) : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर यांचे वतीने १०ते १८ जुलै या कालावधीत कौशल्य सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात युवकांसाठी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील संधी, कौशल्य विकास, उद्योजकता तसेच देश-विदेशातील रोजगाराच्या संधी याबाबत विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य सप्ताहाची सुरुवात १० जुलै रोजी ज्ञानगंगा एज्युकेशन, जवाहरनगर येथे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) नोंदणी व मार्गदर्शन सत्राने झाली. १३ जुलै रोजी न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे AI मधील संधी’या विषयावर आयटी तज्ज्ञ स्वप्निल इंगवले मार्गदर्शन करणार आहेत. १४ जुलै रोजी सुपर कॉम्प्युटर एज्युकेशन,…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, कुंभी नदीवरील- सांगरुळ, वारणा नदीवरील- कोडोली, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी, वेंदगंगा नदीवरील- सुरुपली असे एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहेत. आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.36 टीएमसी, तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 34.40 टीएमसी, दूधगंगा 25.39 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.72 टीएमसी, पाटगाव 3.72…

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती शिरोळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा, उद्दिष्टपूर्तीचा तसेच मान्सून पूर्वतयारीचा तालुकास्तरीय आढावा घेण्यासाठी बैठक सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सरिता नांदेकर, शिक्षण व अर्थ सभापती शितल यादव, महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, पंचायत सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनिषा कदम प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत ग्रामीण गृहनिर्माण विभागांतर्गत रमाई आवास,…

Read More

कोल्हापूर दि:10 (जिमाका) देशातील एचआयव्ही संसर्गितांचे आकडेवारी आटोक्यात आणण्यासाठी मिशन एड्स सुरक्षा अभियान देशभर चालू आहे. एच.आय.व्ही. चे 95:95:99 हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न चालू असून जिल्ह्यातील खासगी डॉक्टर्सनी त्यांच्याजवळ एच.आय.व्ही. औषधोपचार घेत असणाऱ्या रुग्णांची सांख्यिकी माहिती शासनाला दिल्यास हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मदत होणार असल्याने सर्व खाजगी डॉक्टर्सनी ही माहिती शासनास सादर करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले. जिल्हा एड्स नियंत्रण समितीची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.यावेळी CPR च्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेश्मा पाटील,जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रासह सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये गरोदर मातांची एच.आय.व्ही. तपासणी व्हायला हवी,एड्स नियंत्रणामध्ये…

Read More

मुंबई दि.१० : नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशी करण्यात येत आहे. यासाठी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असून त्यात विविध विभागांतील तज्ज्ञांचा समावेश असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. एकत्रित आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार डॉ. राहुल आहेर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ निपुण…

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगिकृत व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र 31 जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे, असे आवाहन जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले. जून 2026 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष/स्त्री ) संकलीत करण्याचे काम सुरु आहे. सांख्यिकी विभागाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. ई-आर 1 विवरणपत्र सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे. अधिक…

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवार, दिनांक 10 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शनिवार, 11 जुलै रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता कै. उर्मिला उदय कुलकर्णी यांच्या राहत्या घराची भिंत व छप्पर कोसळून पडलेल्या स्थळाची पाहणी व त्यांच्या निधन पश्चात घरी सांत्वनपर भेट. (स्थळ : लोहार गल्ली, कागल) सकाळी 10.15 वाजता शेंडा पार्क येथील सुरु असलेल्या 600 बेड रुग्णालय, 250 बेड अतिविशेषोपचार रुग्णालय व 250 बेड कर्करोग रुग्णालय येथील बांधकामाची पाहणी. सकाळी 10.30 वाजता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, सांगाव,…

Read More

शेती ही महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा मुख्य आधार आहे. मात्र, हवामानातील अनिश्चितता, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील चढ-उतार आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात. अशा परिस्थितीत केवळ तात्पुरता दिलासा देणे पुरेसे नसून शेतकरी पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, उत्पादनक्षम बनेल आणि भविष्यात कर्जाच्या दुष्टचक्रात अडकणार नाही, अशी दीर्घकालीन व्यवस्था उभी करणे आवश्यक ठरते. याच व्यापक दृष्टिकोनातून राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी आणि सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांची ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शाश्वत कृषी विकासाच्या व्यापक…

Read More

कोल्हापूर, दि. 09 (जिमाका): प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे कर्ज मागणीचे अर्ज विविध कारणांमुळे बँकांकडे प्रलंबित आहेत अथवा बँकांनी नामंजूर केले आहेत अशा लाभार्थ्यांच्या कर्ज मागणी अर्जाचे पुनरावलोकन, पडताळणी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी लिड डिस्ट्रिक्ट मॅनेजर (LDM) यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व बँका, MSME DFO आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर 2023 मध्ये योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 15 हजार 521 कारागीरांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देण्यात आली असून तसे प्रमाणपत्र त्यांना वितरीत करण्यात आले आहे. 11 हजार 246 कारागीरांना त्यांच्या कारागिरीनुसार प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येकी 4 हजार रूपये इतका…

Read More

कोल्हापूर, दि. 09 (जिमाका): जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर मार्फत खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण चाचणीकरिता जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये सहभाग असणाऱ्या खेळाडूंना 16 जुलै रोजी होणाऱ्या निवड चाचणीमध्ये भाग घेता येणार आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेशाकरिता कुस्ती खेळणारी मुले (05) व मुली (09) खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. कुस्तीचे खेळाडू (मुले व मुली)- वयोगट 12 ते 16 वर्षे, चाचणी कालावधी- 16 जुलै रोजी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मंगळवार पेठ, कोल्हापूर. या चाचणीकरीता जिल्हा विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी असणारे खेळाडू पात्र असणार आहेत. निवड चाचणीसाठी सोबत जन्म दाखला, आधार कार्ड…

Read More