कोल्हापूर दिनांक 23- वकिली व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या वकील बंधू आणि भगिनींसाठी न्यायाधीश होण्याची सुलभ संधी निर्माण झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने प्रवेशस्तरावरील न्यायिक
सेवा परीक्षेसाठी आवश्यक असलेला 3 वर्षांचा वकिली अनुभव बदलून 1 वर्षाचा केला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे कायद्याची पदवी घेतलेल्या तरुणांना न्यायिक सेवा परीक्षेला बसण्याची संधी लवकर मिळेल.
निवडीनंतर उमेदवारांना प्रशिक्षण आणि न्यायालयीन कामाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे.त्यामुळे तरुण होतकरू वकिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.त्यामुळे जास्तीत जास्त वकील या संधीचा लाभ घेऊन देशाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका पार पाडतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
