Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
*कोल्हापूर, दि. ०८* : कोल्हापूर शहराच्या हद्दीलगत विस्तारत असलेल्या नागरी वसाहतींच्या आणि गावांच्या सुनियोजित विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणास (KUADA) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ४० अन्वये ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ (SPA) हा महत्त्वपूर्ण दर्जा मिळावा, यासाठीचा अधिकृत प्रस्ताव आज, ८ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे प्राधिकरणाच्या कक्षेतील ४२ गावांमधील विकासाचे प्रश्न मार्गी लागणार असून, कोल्हापूरच्या उपनगरांमध्ये सुनियोजित विकासाचे एक नवीन पर्व सुरू होण्याची चिन्हे आहेत. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला गती मिळण्यामागे लोकप्रतिनिधींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे. करवीर विधानसभेचे आमदार चंद्रदीप नरके…
कोल्हापूर, दि. 3 : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दृष्टीहीन दिव्यांग असलेल्या दिपाली पाटील यांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, तसेच प्रमुख उपस्थिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुवर्णा सावंत या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधना कांबळे यांनी केले. त्यांनी दिव्यांग व्यक्तींचे हक्क, अधिनियम, छळ-हिंसाचार प्रतिबंध, शासन निर्णय, तसेच संस्था नोंदणी व देखरेख याबाबत सर्वसमावेशक माहिती दिली. कर्णबधीर विद्यालय कागलचे विशेष शिक्षक संतोष गायकवाड यांनी दिव्यांग व्यक्ती अधिनियम…
कोल्हापूर दि. 2 (जि. मा. का)* : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायत मध्ये आज सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत 61.99 टक्के मतदान झाले. एकुण 318 मतदान केंद्रांवर 2,55,737 मतदारांपैकी 1,58,527 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 76,400, महिला 82,121 तर इतर 6 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणे *नगरपरिषद* जयसिंगपूर – 49747 पैकी 22958, 46.15%, मुरगूड – 10128 पैकी 7348, 72.55%, मलकापूर -4934 पैकी 3700, 74.99% वडगाव – 23044 पैकी 16918, 73.42% गडहिंग्लज-30161 पैकी 17917, 59.40% कागल – 28753 पैकी 18857, 65.58% पन्हाळा – 2967 पैकी 2089, 70.41% कुरुंदवाड – 22224…
कोल्हापूर दिनांक 1- तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी *येथे 4 डिसेंबर 2025* रोजी *दत्त जयंती महोत्सव सोहळा* पार पडणार असून ग्रामस्थ व दत्त भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा महसूल व पोलीस प्रशासन यांनी पाहणी करून दिलेल्या सूचनेनुसार श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकाना दत्त दर्शन सुरळीत घेता यावे यासाठी नृसिंहवाडी ग्रामपंचायत व दत्त देवस्थान यांनी अत्यंत चांगले नियोजन केले असून त्याच बरोबर दर्शन मार्ग, पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था व पोलीस बंदोबस्त याचे चांगले नियोजन केले आहे याचबरोबर *विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहावा* यासाठी *महाराष्ट्र विद्युत महावितरण चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन* विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेत आहेत. दत्त…
कोल्हापूर: शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली व कोल्हापूर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, वॉर्ड दवाखाना यांना भेटी देऊन नागरिकांचे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन यामध्ये सुधारणा करण्याबाबत महानगरपालिकेचे उपायुक्त किरण धनवडे यांना निवेदन देण्यात आले. या आरोग्य केंद्रांच्या भेटीमध्ये प्रामुख्याने हिरकणी कक्षाचा अभाव, जुन्या व जीर्ण झालेल्या इमारती, अपुरा स्टाफ, स्वच्छतागृहांची दुर्दशा आणि अभाव, पार्किंगचा प्रश्न, कंपाउंड चा अभाव, स्थानिक नागरिकांचा त्रास, बंद पडलेली रक्तपेढी, इलेक्ट्रिसिटी बॅकअप चा अभाव, पावसामुळे भिंतींना ओलावा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्या समोर आल्या. नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र…
कोल्हापूर, दि. २८ : समाजात रुजलेल्या अनिष्ट, अघोरी अमानुष गैरसमजुतीमुळे समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. लोकांचे होणारे शोषण व छळ थांबवण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीतून सूचना केल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबाजवणी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज कुमार, सदस्य सचिव सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांच्यासह आरोग्य, शिक्षण, जिल्हा माहिती कार्यालय, महिला व बालविकास, पोलीस, माविम विभागाचे प्रमुख तथा समिती सदस्य उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या जादूटोणा घटना व तक्रारींबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसेच पोलीस विभागाने दोन…
कोल्हापूर दि : 28 (जिमाका) देशाच्या सर्वांगीण विकासात स्त्री शक्तीचे महत्त्वाचे योगदान आहे.या शक्तीला दुर्लक्षित करून चालणार नाही असे प्रतिपादन खासदार छ.शाहू महाराज यांनी केले. येथील NCC गट मुख्यालय (कोल्हापूर) या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज ट्रेक टेल मोहिमेसाठी मुलींची आज स्वतंत्र तुकडी रवाना झाली . या तुकडीला शाहू महाराजांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला. तत्पूर्वी उपस्थित एनसीसी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, परदेशातील स्त्रियांना अलीकडे समानतेची वागणूक मिळत आहे .तथापि आपल्याकडे छ.शिवाजी महाराजांनी साडे तीनशे वर्षांपूर्वीच स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली ही कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी ट्रेकिंग करत असताना स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन करत या मोहिमेत विविध राज्यातील सहभागी झालेल्या विद्यार्थीनींना…
कोल्हापूर, दि. २५ : मतदार जनजागृतीसह आदर्श आचारसंहितेचे पालन करून सर्व निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्ह्यातील मुरगुड, गडहिंग्लज, चंदगड व आजरा नगरपालिकांमधील कामकाजाचा आढावा त्यांनी प्रत्यक्ष भेटीतून घेतला. यावेळी स्ट्रॉंग रूम, स्थायी निरीक्षण पथक (एसएसटी), मतमोजणीबाबतची तयारी, ईव्हीएम यंत्र तयारी, मतपत्रिका छपाई, प्रशिक्षण, मतदान केंद्र अशा विविध ठिकाणी जाऊन कामकाजाबाबत आवश्यक सूचना केल्या. त्यांच्याहस्ते वोटर स्लीपचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा सहआयुक्त (नगर प्रशासन) नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. यावेळी ठिकठिकाणी सुरू असलेल्या प्रशिक्षण सत्रांमध्ये भेटी देत…
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): राज्यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवार, 2 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती उप सचिव हेमंत महाजन यांनी अधिसूचनेव्दारे दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ, वडगाव (कोल्हापूर) या नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सार्वजनिक सुट्टी नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहील. तसेच उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इ.…
कोल्हापूर दिनांक 28 – गोवा येथे झालेल्या रॉयल एनफिल्ड आयोजित मोटोवर्स 2025 या इव्हेंट मध्ये झालेल्या डर्ट ट्रॅक स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे कोल्हापूरच्या टीम डीजे रेसिंग टीमने बक्षीसांची लयलूट करून गेली 13 वर्षे सलग टीम चा आणि कोल्हापूरचा दबदबा कायम ठेवला आहे. या स्पर्धेत टीम डीजेच्या दुष्यंत जाधव यांनी अनुक्रमे 650 सीसी गटात द्वितीय क्रमांक व 350 सी सी नोवीस गटात होल शॉट मेडल आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच टीमच्या आशिष जाधव याने 350 सीसी एक्सपर्ट प्रकारात होलशॉट मेडल आणि तिसरा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर टीमच्या अमेय काकडे याने 350 सीसी नोवीस गटात द्वितीय क्रमांक पटकावला. या इव्हेंटमध्ये प्रथमच यावर्षी इंडोरन्स रेस…