कोल्हापूर दिनांक 28 – गोवा येथे झालेल्या रॉयल एनफिल्ड आयोजित मोटोवर्स 2025 या इव्हेंट मध्ये झालेल्या डर्ट ट्रॅक स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे कोल्हापूरच्या टीम डीजे रेसिंग टीमने बक्षीसांची लयलूट करून गेली 13 वर्षे सलग टीम चा आणि कोल्हापूरचा दबदबा कायम ठेवला आहे.
या स्पर्धेत टीम डीजेच्या दुष्यंत जाधव यांनी अनुक्रमे 650 सीसी गटात द्वितीय क्रमांक व 350 सी सी नोवीस गटात होल शॉट मेडल आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच टीमच्या आशिष जाधव याने 350 सीसी एक्सपर्ट प्रकारात होलशॉट मेडल आणि तिसरा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर टीमच्या अमेय काकडे याने 350 सीसी नोवीस गटात द्वितीय क्रमांक पटकावला. या इव्हेंटमध्ये प्रथमच यावर्षी इंडोरन्स रेस हा नवीन प्रकार घेण्यात आला होता. त्यामध्ये सुद्धा टीमच्या अक्षय जाधव, शुभंकर कोळसे, आशिष जाधव , दुष्यंत जाधव, अमेय काकडे व हितेश घाडगे यांनी आपले प्राविण्य दाखवत दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. रेस ऑफ चॅम्पियन्स मध्ये टिम च्या सर्व रायडर्स नी उत्कृष्ट प्रदर्शन केले.
क्लब लीडरशिप बोर्ड मध्ये जास्तीत जास्त गुण घेऊन या दुसर्या क्रमांकाचे स्थान पटकावले. स्पर्धेमध्ये रॉयल एनफिल्ड चे सीईओ सिद्धार्थ लाल यांच्या हस्ते एकूण 7 पारितोषके दोन मेडल व रोख पारितोषके देऊन टीमला सन्मानित करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी टीम चे आशिष काळे सर, अनिकेत कोरगांवकर,निखील नलवडे, संजय कोकाटे, स्वप्नील अष्टेकर, परिक्षित साटम, अभि पोवार, ,लंबोदर जाधव आदींचे सहकार्य मिळाले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
