कोल्हापूर दिनांक 1- तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी *येथे 4 डिसेंबर 2025* रोजी *दत्त जयंती महोत्सव सोहळा* पार पडणार असून ग्रामस्थ व दत्त भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा महसूल व पोलीस प्रशासन यांनी पाहणी करून दिलेल्या सूचनेनुसार श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकाना दत्त दर्शन सुरळीत घेता यावे यासाठी नृसिंहवाडी ग्रामपंचायत व दत्त देवस्थान यांनी अत्यंत चांगले नियोजन केले असून त्याच बरोबर दर्शन मार्ग, पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य व्यवस्था व पोलीस बंदोबस्त याचे चांगले नियोजन केले आहे याचबरोबर *विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहावा* यासाठी *महाराष्ट्र विद्युत महावितरण चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन* विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेत आहेत.
दत्त जयंती सोळा सुरळीत पार पाडावा यासाठी नृसिंहवाडीचे सरपंच चेतन चंद्रकांत गवळी, उपसरपंच अनघा उत्तम पुजारी व सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत याचबरोबर माजी यशवंत सरपंच धनाजीराव चिमासाहेब जगदाळे दादा व मराठा क्रांती ठोक मोर्चा अध्यक्ष सागर बाळासाहेब धनवडे यांनी वरिष्ठांच्या संपर्कात राहून विशेष प्रयत्न करून सगळे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने केले आहे त्याची त्यांनी पाहणी केली यामध्ये नृसिंहवाडी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
