कोल्हापूर दि. 2 (जि. मा. का)* : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायत मध्ये आज सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत 61.99 टक्के मतदान झाले. एकुण 318 मतदान केंद्रांवर 2,55,737 मतदारांपैकी 1,58,527 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 76,400, महिला 82,121 तर इतर 6 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणे
*नगरपरिषद*
जयसिंगपूर – 49747 पैकी 22958, 46.15%,
मुरगूड – 10128 पैकी 7348, 72.55%,
मलकापूर -4934 पैकी 3700, 74.99%
वडगाव – 23044 पैकी 16918, 73.42%
गडहिंग्लज-30161 पैकी 17917, 59.40%
कागल – 28753 पैकी 18857, 65.58%
पन्हाळा – 2967 पैकी 2089, 70.41%
कुरुंदवाड – 22224 पैकी 15360, 69.11%
हुपरी – 24802 पैकी 14469, 58.34%
शिरोळ – 24539 पैकी 14887, 60.67%
*नगरपंचायत*
आजरा -14686 पैकी 10017, 68.21%
चंदगड – 8315 पैकी 5925, 71.26%
हातकणंगले – 11437 पैकी 8082, 70.67%
