Author: admin

जून महिना उजाडला की नव्या शैक्षणिक वर्षाची चाहूल लागते. घराघरांत मुलांच्या शाळा प्रवेशाची लगबग सुरू होते. आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत प्रवेश द्यावा, हा प्रत्येक पालकासमोरील महत्त्वाचा प्रश्न असतो. अशा वेळी एक मराठी माणूस, एक जबाबदार पालक आणि आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणारा नागरिक म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे – “आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश का देऊ नये?” आज आपल्या राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम शिक्षक, आधुनिक सुविधा आणि संस्कारक्षम वातावरण यामुळे नव्या उंचीवर पोहोचत आहेत. याला आणखी उंचीवर पोहोचविण्यासाठी आवश्यक आहे तो पालकांचा विश्वास ! आणि पालक म्हणून आपला सक्रिय सहभाग ! केवळ…

Read More

कोल्हापूर, दि. १२ (जिमाका): जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उंचावणारे शाहूवाडी तालुक्यातील गोंडोली गावचे सुपुत्र वीर जवान विक्रम बाळकृष्ण चव्हाण यांना वीरमरण आले. या वीर सुपुत्राच्या पार्थिवावर आज गोंडोली येथील वारणा नदीच्या तीरावर शासकीय इतमामात आणि साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद विक्रम चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण शाहूवाडी तालुक्यातील विद्यामंदिर गोंडोली येथे झाले होते, तर पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोकरूड येथील यशवंत महाविद्यालयातून पूर्ण केले होते. देशसेवेची आवड असल्याने त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि अहिल्यानगर येथे आपले लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१८ मध्ये राजस्थानमधील…

Read More

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आजअखेर राज्यातील सुमारे ५१ लाख नागरिकांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे २५ लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्डेही लवकरच सुरू करण्यात येत असल्याने लाभार्थ्यांनी…

Read More

कोल्हापूर, दि. ११ : जिल्ह्यात कोणत्याही व्यवसायात १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवू नये, तसेच शासनाच्या ३० जुलै २०१६ च्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित उद्योग व प्रक्रिया करणाऱ्या संस्थांमध्ये १४ वर्षांखालील बालक तसेच १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या आस्थापनेमध्ये बालकास कामावर ठेवल्यास संबंधितांवर ६ महिने ते २ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा २० ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. तसेच प्रतिबंधित उद्योग व प्रक्रिया करणाऱ्या संस्थांमध्ये किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवल्यासही अशीच कारवाई होऊ शकते. ज्या आस्थापनांमध्ये बालकामगार आढळून येतील, त्या आस्थापनांचा परवाना अथवा नोंदणी रद्द केली जाऊ शकते तसेच…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, या योजनेअंतर्गत देशातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत युवकांना विविध क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिप दिली जाणार असून, त्यासाठी दरमहा 9 हजार रुपये विद्यावेतनही प्रदान करण्यात येणार आहे. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून स्वतःचे प्रोफाइल तयार करावे आणि विविध क्षेत्रांतील इंटर्नशिपसाठी अर्ज करावेत. उमेदवारांना अर्जाच्या अंतिम मुदतीपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करता येणार आहे. या फेरीत टाटा…

Read More

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यात माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) परीक्षेकरीता 24 परीक्षा केंद्रे असून परिक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत घेण्यात येणार आहेत. जिल्हयात ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालांत (इयत्ता 10 वी) परीक्षा घेण्यात येणार आहेत अशा परीक्षा केंद्रांच्या/उपकेंद्रांच्या 100 मीटर परिसरात 16 जून ते 8 जुलै या परीक्षा कालावधीत (ज्या दिवशी परीक्षेचे पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वा. पासून ते सायं. 6 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम…

Read More

कोल्हापूर, दि. ११ (जिमाका) : मुंबई मुख्यालय तसेच पुणे येथील धर्मादाय कार्यालयाची भोजनाची वेळ दुपारी १.३० ते २ अशी आहे. मुंबई मुख्यालय, पुणे, कोल्हापूर तसेच अधिनस्त सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या भोजनाच्या वेळेत तफावत असल्याने, महत्त्वाच्या कामकाजासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण करताना अडचणी निर्माण होत होत्या. मुंबई मुख्यालय, पुणे व अधिनस्त कार्यालयांकडून माहिती प्राप्त करून घेणे तसेच कोल्हापूर विभागातील माहिती संबंधित कार्यालयांना पाठविणे यामध्ये व्यत्यय येत होता. शासन परिपत्रकात नमूद केलेली वेळ आणि विभागीय कार्यालयांची भोजनाची वेळ यामध्ये विसंगती दिसून येत होती. त्यामुळे कार्यालयीन कामकाजामध्ये सुसूत्रता व समन्वय साधण्यासाठी या आदेशान्वये कोल्हापूर कार्यालय तसेच अधिनस्त सांगली, रत्नागिरी आणि…

Read More

कोल्हापूर, दि. 11 : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे नियोजन केले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण या मोहिमेत सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या घटसर्प (Haemorrhagic Septicaemia) व फऱ्या (Black Quarter) यांसारख्या घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची गुणवत्ता टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. लसीचा प्रभाव उत्तम राहण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवण्यात आले असून राज्यस्तरापासून ते थेट ग्रामीण भागातील उपकेंद्रांपर्यंत लस पोहोचवताना आवश्यक तापमान राखले जाईल, यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर केला जात आहे. ही…

Read More

कोल्हापूर, दि. 11 : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे दौऱ्यावर येत आहेत. गुरुवार, 11 जून रोजी रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शुक्रवार, 12 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थान येथे सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 ते 5.30 वाजता राखीव. सायं. 5.30 वाजता गलगले, ता. कागल येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शनिवार, 13 जून रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10.30 वाजता गोरंबे, ता. कागल येथील प्राथमिक शाळेच्या नूतन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी…

Read More

कोल्हापूर, दि. 11 : राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सन 2026-27 या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन ‘पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे’ येथे सुरू झाले आहे. 21 व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्हानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्प्यात एकूण लस उत्पादनाच्या 40 टक्के म्हणजेच 37 लाख 52 हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, त्या भागात प्राधान्य क्रमाने लसीकरण…

Read More