Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर दि17:(जिमाका) १९७१ साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात १७ डिसेंबर रोजी वीरमरण पत्करलेले महावीर चक्र सन्मानित कॅप्टन शंकर सखाराम वाळकर (१८ मद्रास रेजिमेंट) यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा पार्क, कोल्हापूर येथे ६ महाराष्ट्र गर्ल्स एनसीसी बटालियन, कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी कॅप्टन शंकर सखाराम वाळकर यांच्या स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात येवून उपस्थित 400 कॅडेट्सनी हुतात्मा पार्क परिसरात स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी कोल्हापूरमधील निवृत्त लष्करी अधिकारी, मद्रास रेजिमेंटचे माजी सैनिक तसेच 18 मद्रास रेजिमेंटचे सेवारत अधिकारी, सैनिकांनी कॅप्टन वाळकर यांच्या तत्कालिन असीम शौर्याचे तसेच देशासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून…
▪️ २१ डिसेंबर रोजी मतमोजणी ▪️ राज्य निवडणूक आयोगाकडून कोल्हापूरचे विशेष अभिनंदन ▪️ गडहिंग्लज नगरपरिषदेच्या एका जागेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान *कोल्हापूर, दि. १७* : जिल्ह्यातील १३ नगरपालिकांमधील निवडणुका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. या अनुषंगाने सर्व ठिकाणी मतमोजणीसाठी आवश्यक सुविधांची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ऑनलाईन बैठकीतून राज्य निवडणूक आयोगामार्फत तयारीबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, सहआयुक्त नगरप्रशासन नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींमधील निवडणुका ३१८ मतदान केंद्रांवर पार पडल्या. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका)* : अल्पसंख्याक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काची जाणीव, माहिती देण्यासाठी अल्पसंख्याक हक्क दिवसाच्या अनुषंगाने उद्या गुरुवार 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली महाराणी तारबाई सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले आहे.
कोल्हापूर दि. १५ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर आज सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आगमन झाले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी त्यांचे स्वागत केले. इचलकरंजी येथील कार्यक्रमासाठी विशेष विमानाने ते कोल्हापूर येथे आले होते. त्यांच्यासोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेही आगमन झाले. कोल्हापूर विमानतळावरुन लगेच त्यांनी इचलकरंजीसाठी हेलिकॉप्टरने प्रस्थान केले. इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व विविध विकास कामांचे भूमिपूजन ते करणार आहेत. त्यानंतर त्यांचा सांगली दौरा असून सांगली वरुन पुणे येथे विविध कार्यक्रमांसाठी प्रस्थान करणार आहेत. ***
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सवांना प्रोत्साहन मिळावे, सामाजिक सलोखा वृद्धिंगत व्हावा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे यासाठी गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी शासनाच्या पोर्टलवर नोंदणीची सुविधा देण्यात आली होती. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील एकूण 18 मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये शाहूवाडी, गडहिंग्लज, राधानगरी येथून प्रत्येकी एक मंडळ तर कागल येथून 2, हातकणंगले 3 आणि करवीर तालुक्यातील 10 मंडळांनी सहभाग नोंदवला. प्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती तसेच 2 अशासकीय सदस्यांचा समावेश असलेली निवड समिती तसेच तालुका स्तरावर…
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी निःशुल्क अनिवासी अमृत-बेकरी प्रशिक्षण 18 डिसेंबर ते 17 जानेवारी 20 या कालावधीत कॉन्टिनेन्टल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, प्लॉट नं. 136 ई वार्ड, शास्त्री नगर रोड, वाय.पी.पोवार नगर कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. खुल्या प्रवर्गातील जाती-ब्राह्मण,बनिया,कम्मा, राजपुरोहीत,कायस्थ,ऐयांगर,नायर,नायडू,त्यागी, पाटीदार,बंगाली,पटेल,येलगार,मारवाडी,ठाकूर, सेनगुंथर,गुजराथी,जाट,सिंधी, कानबी,राजपूत, कोमटी या प्रवर्गासाठी असून प्रवेश मर्यादा 40 असणार आहे. तांत्रिक प्रशिक्षण 24 दिवस-बेकरी उत्पादनांची व्याप्ती आणि महत्व,बेकरीमध्ये विविध व्यवसाय संधी :- बेकरी उत्पादनांच्या…
जास्तीत जास्त नागरिकांनी 20 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे प्राधिकरणाचे आवाहन सर्वोत्कृष्ट बोधचिन्हास मिळणार तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक नाशिक, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी आता अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपयांच्या पारितोषिकांसह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी २० डिसेंबर, २०२५…
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतींची निवडणुकीची प्रक्रिया सुरु असुन राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशान्वये रविवार, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये 21 डिसेंबर रोजी विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढणे. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्ते / कोणत्याही व्यक्ती राजकीय पक्ष/संस्था यांनी गावातून / शहरातून मिरवणूक /रॅली काढणे. सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे. फटाके लावणे/फोडणे, या कृती करण्यास मनाई केली आहे. हा…
कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व 3 नगरपंचायतींची निवडणुकीची प्रक्रिया सुरु असुन राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशान्वये रविवार, 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पन्हाळा, मलकापूर, वडगांव, हुपरी, जयसिंगपुर, शिरोळ, कुरुंदवाड, गडहिंग्लज, कागल, मुरगूड या नगरपरिषद व हातकणंगले, आजरा व चंदगड नगरपंचायत मधील मतदार संघासाठी 2 डिसेंबर रोजी विनिर्दिष्ट ठिकाणी मतदान झाले असून रविवार, 21 डिसेंबर रोजी नगरपरिषद व नगरपंचायत मतदारसंघ निहाय…
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ 2025 कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली 16 डिसेंबर रोजी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे. 0000