Author: admin

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : रघुनाथ पाटील, त्र्यंबक पाटील, म.वा. तेजस्वीनी पाटील, नम्रता पाटील, ओंकार पाटील, सर्जेराव शिपुगडे, उदयसिंग पाटील यांच्याकडून एकूण रक्कम रु. 5 लाख 67 हजार 508 इतकी रक्कम वसुल करण्यासाठी स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण 5 लाख 67 हजार 508 रुपये रक्कम भरली नाही तर नमुद मालमत्ता तहसिलदार कार्यालय, करवीर येथे 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजता जाहीर लिलाव करुन विकली जाणार आहे, अशी माहिती करवीर तहसिलदार यांनी दिली आहे. रघुनाथ पाटील यांच्या मालकीचे मौजे हिरवडे दुमाला येथील 1 कोटी 49 हजार 800, त्र्यंबक पाटील,…

Read More

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन व राज्य शासन अंगिकृत व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरावे,असे आवाहन जिल्हा रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले. डिसेंबर 2025 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 (त्रैमासिक) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष/स्त्री ) संकलीत करण्याचे काम सुरु आहे. सांख्यिकी विभागाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आले आहेत. ई-आर 1 विवरणपत्र सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाही नंतर महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे. अधिक…

Read More

कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंम्बाईनड डिफेन्स सर्व्हिस (CDS) परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्यातील नवयुवक व नवयुवतींसाठी 19 जानेवारी ते 3 एप्रिल या कालावधीत CDS कोर्स क्र. 66 आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे 15 जानेवारी रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले.कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाणार आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of…

Read More

कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : पोस्टल पेन्शनधारकांच्या / कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन, पणजीव्दारे पेंशन अदालत मंगळवार, 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन, पणजी-403001 येथे आयोजित केली आहे. (गोवा राज्य, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे.) निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे./टपाल विभागाचे निवृत्ती वेतनधारक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे जसे की वारसा प्रमाणपत्र आणि धोरणात्मक बाबींसह प्रलंबित प्रकरणांचा…

Read More

 भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्ये यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या एक थोर समाजसुधारक, कवयित्री आणि परिवर्तनाच्या सर्वकालीन प्रतिक आहेत.  ज्या काळात स्त्रीने शिकणे पाप मानले जात होते, त्या काळात त्यांनी शिक्षणाचा दिप प्रज्वलित करुन सामाजिक अज्ञानाच्या अंधाराला आव्हान दिले. स्वत:च्या आयुष्याला आकार देतानाच भारतीय स्त्री- शिक्षणाच्या पायाही त्यांनी घातला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे शेतकरी होते. बालवयातच त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले…

Read More

कोल्हापूर दिनांक 30 – राज्यात सर्वत्र महानगरपालिकांच्या निवडणुकीची धूम चालू झाली आहे.यापूर्वी विधानसभेला निवडून आलेल्या आमदारांच्या विजयासाठी जीवाचे रान केलेल्या कार्यकर्त्यांची यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ आर्थिक कमजोरी बघून नेत्यांनी तिकिटे कापली आहेत.त्यामुळे हाडाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांनीच कट्ट्यावर बसविले असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.त्यामुळे पायाला भिंगरी लावून नेत्यांचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याऐवजी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपले करिअर सांभाळून राजकारण करावे असा मोलाचा सल्ला जाणकार देत असल्याचे दिसून येते.

Read More

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमांतर्गंत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी 60 दिवसांच्या आत तपास करुन दोषींवर मुदतपूर्व दोषारोपपत्र दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले . जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) सचिन साळे, पो. उपअधिक्षक तानाजी सावंत प्रामुख्याने उपस्थित होते . जिल्हाधिकारी म्हणाले, अत्याचारग्रस्तांची संख्या एखाद्या महिन्यातच अचानक का वाढते आहे याचे अवलोकन व्हावे. त्याचबरोबर दाखल प्रकरणांचा त्वरीत निपटारा करण्यात यावा. अशासकीय सदस्यांनी निकषांची पूर्तता करणाऱ्या पिडीतांना तसेच त्यांच्या वारसदारांना शासकीय नोकरीच्या अनुषंगाने परिपूर्ण असे…

Read More

कोल्हापूर दिनांक 28 – कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसकडून सर्व साधारण महिला गटातून जुना बुधवार पेठ येथील माजी नगरसेवक धनंजय सावंत यांची कन्या कु.तनिष्का सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.सर्वात तरुण महिला उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. माजी नगरसेवक धनंजय सावंत यांचा संपूर्ण प्रभात असणारा जनसंपर्क आणि प्रभाव तनिष्का सावंत यांच्या पाठीशी असणार आहे.सुशिक्षित तरुणी निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याने मतदारांच्यात उत्सुकता निर्माण झाली असल्याचे दिसून येते.कू.तनिष्का बी.टेक. इंजिनियरिंग करत असून त्याचा प्रभागाच्या विकासासाठी उपयोग होणार असल्याचे दिसून येते.

Read More

कोल्हापूर दि : 27 (जिमाका) एनसीसी ग्रुप मुख्यालय, कोल्हापूरच्या अंतर्गंत ११ विद्यार्थ्यांची प्रजासत्ताक दिन परेड (2026) शिबिरासाठी निवड झाली आहे .यामध्ये 5 विद्यार्थी तर 6 विद्यार्थीनींचा समावेश आहे. या तुकडीत राज्यभरातून 127 एनसीसी विद्यार्थी सहभागी झाले आहेत.कोल्हापूर मुख्यालयासाठी हा अत्यंत अभिमान व गौरवास्पद क्षण आहे. निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे-सीनियर अंडर ऑफिसर हिमेश राठोड,रिद्धी पदमुखे,सर्जंट राधिका क्षत्रिय (डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी),मधुरा बाटे (न्यू कॉलेज कोल्हापूर),सीनि.अंडर ऑफिसर ओंकार पवार (वाय.सी.कॉलेज ऑफ सायन्स, कराड) प्रसाद वांगेकर (गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कराड),प्रमोद चव्हाण,सुष्मिता राठोड(आर.पी.गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरी ज्युनि.अंडर ऑफिसर तनिष्का चव्हाण (सी.एस. कॉलेज सातारा) ज्युनि.अंडर ऑफिसर निशांत चव्हाण(विलिंग्डन कॉलेज सांगली) ज्युनि.अंडर ऑफिसर सृष्टी…

Read More

कोल्हापूर, दि. 24 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, 25 डिसेंबर रोजी सकाळी 10.50 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व राखीव. सोमवार, 29 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण. 0000

Read More