कोल्हापूर दिनांक 28 – कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये काँग्रेसकडून सर्व साधारण महिला गटातून जुना बुधवार पेठ येथील माजी नगरसेवक धनंजय सावंत यांची कन्या कु.तनिष्का सावंत यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.सर्वात तरुण महिला उमेदवार म्हणून त्यांची उमेदवारी लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
माजी नगरसेवक धनंजय सावंत यांचा संपूर्ण प्रभात असणारा जनसंपर्क आणि प्रभाव तनिष्का सावंत यांच्या पाठीशी असणार आहे.सुशिक्षित तरुणी निवडणुकीच्या मैदानात उतरत असल्याने मतदारांच्यात उत्सुकता निर्माण झाली असल्याचे दिसून येते.कू.तनिष्का बी.टेक. इंजिनियरिंग करत असून त्याचा प्रभागाच्या विकासासाठी उपयोग होणार असल्याचे दिसून येते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
