Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या सैनिकी मुला व मुलींचे वसतीगृह कोल्हापूर, सैनिकी मुलांचे वसतिगृह पन्हाळा आणि सैनिक आरामगृह कोल्हापूर साठी अशासकीय पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. सैनिकी मुलांचे वसतिगृह, कोल्हापूर येथे सहा. वसतिगृह अधिक्षक / लिपीक- 3 (पुरुष)- 24 हजार 875 रुपये एकत्रित मानधन, स्वयंपाकी- 6 (महिला)- 14 हजार 106 रुपये एकत्रित मानधन, सफाई कर्मचारी- 1 (पुरुष)- 13 हजार 271 रुपये एकत्रित मानधन, पहारेकरी- 1 (पुरुष)- -1 हजार 159 रुपये मानधन. सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूर येथे वसतिगृह अधिक्षीका- 1 (महिला)- 31 हजार 875 रुपये, वसतिगृह सहा. अधिक्षीका- 3 (महिला)- 24…
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : कृषी विभागामार्फत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यास खरीप तुर बीयाणे संच / सीडकीट ( वाण- गोदावरी तूर / BDN 2013-41) इच्छुक शेतक-यांना 100 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. यासाठी शेतक-यांचा फार्मर आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे. बियाणांचा वापर पेरणीसाठी करणे बंधनकारक आहे. अर्ज फक्त Mahadbt पोर्टलवरूनच स्वीकारले जातील. महा-डी.बी.टी. पोर्टलद्वारे प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य (F.C.F.S.) द्वारे लाभ देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत. तांत्रिक माहितीसाठी गावातील सहाय्यक कृषी…
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : दूधगंगा धरणापासून ते सुळकूड कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या दूधगंगा नदीवरील दोन्ही तीरावरील भाग, नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यावरील पाणीफुगीच्या दोन्ही तीरावरील भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसा यंत्रासाठी 10 ते 11 जून या दोन दिवसांच्या कालावधीसाठीची उपसाबंदी रद्द करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर पाटबंधारे उत्तर विभागाचे उपकार्यकारी अभियंता मिलिंद किटवाडकर यांनी दिली. 0000
कोल्हापूर, दि. ०९* : गर्भलिंग निदान, स्त्री भ्रूणहत्या आणि संबंधित बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन संशयास्पद बाबींची माहिती टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४४७५ वर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. या बेकायदेशीर कृत्याची अचूक माहिती देणाऱ्या किंवा स्टिंग ऑपरेशनसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांना, न्यायालयात खटला दाखल झाल्यावर महाराष्ट्र शासनाकडून रक्कम स्वरूपात बक्षीस दिले जाते. पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनसहभागाबरोबरच कठोर कारवायांची आवश्यकता असून, संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्कतेने काम करत कारवाया वाढवाव्यात, असे निर्देश त्यांनी जिल्हास्तरीय पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सरीता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरूद्ध पिंपळे, कोल्हापूर महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश…
कोल्हापूर, दि. ०८ : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’चे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात तंबाखूमुक्तीसाठी व्यापक जनजागृती आणि दंडात्मक मोहिम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या सर्व ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण, पालक आणि शिक्षकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत, व्यसनापासून दूर राहण्याचे विशेष आवाहन केले होते. तसेच, कोल्हापूर आकाशवाणीवरून जिल्हा सिव्हिल सर्जन (प्रभारी) डॉ. सरिता थोरात यांची जनजागृतीपर विशेष मुलाखत प्रसारित…
कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल मुंबईव्दारे 135 वी डाक अदालत 29 जून रोजी दुपारी 4 वा. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, जीपीओ बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, मुंबई कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर डाकघर विभागाच्या प्रवर अधीक्षकांनी दिली. महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार…
कोल्हापूर, दि. ५ : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), कोल्हापूर अंतर्गत प्रेरणा लोकसंचलित साधन केंद्र, वाठार यांच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बचत गटातील महिलांसाठी सेंद्रिय खत निर्मितीचे एकदिवसीय प्रशिक्षण अंबप येथे आयोजित करण्यात आले. Gender Transformative Mechanism (GTM) प्रकल्पांतर्गत झालेल्या या प्रशिक्षणात ६० महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणाचे उद्घाटन माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे यांच्या हस्ते झाले. यावेळी भूमिरत्न अॅग्रो लिमिटेडचे सतीश पाटील आणि वनिता पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून जीवामृत, वर्मी कंपोस्ट (गांडूळ खत) आणि दशपर्णी अर्क निर्मितीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास जिल्हा प्रकल्प सल्लागार सुजाता कणसे, सीएमआरसी व्यवस्थापक त्रिशूल बावधनकर, सीएमआरसी कर्मचारी तसेच बचत…
कोल्हापूर दि:५ (जिमाका) शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी राज्य शासनाकडून निधीची अजिबात कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. शिवाजी विद्यापीठात मंत्री श्री देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन कामकाजाच्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीसाठी कुलगुरू डॉ.राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले,लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात झाले.त्यांचे व्यक्तीमत्त्व आणि जीवनकार्य याविषयी नव्या पिढीला माहिती व्हावी,या दृष्टीने विद्यापीठाने…
कोल्हापूर, दि. ०४ : राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा ४० वा ‘राजर्षी शाहू पुरस्कार – २०२६’ ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जागर करणारे विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोपरांत प्रदान करण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. या पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, डॉ.अशोक चौसाळकर, सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत…
कोल्हापूर, दि. ६ : केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFFS) या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. प्रकल्पाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे ५ जून रोजी, कोल्हापूर जिल्ह्यात १ हजार ३१९ खत बुकिंगसाठी क्यूआर कोड निर्माण करण्यात आले. त्यानंतर आज प्रत्यक्ष खत वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. करवीर तालुक्यातील कोगे येथील मोरे ॲग्रो सर्व्हिसेस अँड प्रॉडक्ट्स येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगारे यांच्या हस्ते क्यूआर कोड स्कॅन करून…