Author: admin

कोल्हापूर दि. 24 (जिमाका): छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना व स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) सोलर योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात दोन ऑक्टोबर पर्यंत एक लाख घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योजना गतिमान करून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना लाभ द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. रूफ टॉप सोलर प्रकल्प समन्वय व अंमलबजावणी समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस, एम.एस. मिसाळ यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री…

Read More

कोल्हापूर दिनांक 23 – करवीर पोलीस ठाणे अधिकारी आणि अंमलदार यांचा आज रोजी झालेल्या गुन्हे परिषदेत अलीकडेच कोल्हापूरमध्ये घडलेल्या गर्भलिंग निदानच्या गुन्ह्यात केलेल्या कामगिरीबाबत सत्कार करण्यात आला.यावेळी करवीर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कळमकर व ठाणे अंमलदार उपस्थित होते.

Read More

कोल्हापूर दिनांक 23-  वकिली व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या वकील बंधू आणि भगिनींसाठी न्यायाधीश होण्याची सुलभ संधी निर्माण झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने प्रवेशस्तरावरील न्यायिक सेवा परीक्षेसाठी आवश्यक असलेला 3 वर्षांचा वकिली अनुभव बदलून 1 वर्षाचा केला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे कायद्याची पदवी घेतलेल्या तरुणांना न्यायिक सेवा परीक्षेला बसण्याची संधी लवकर मिळेल. निवडीनंतर उमेदवारांना प्रशिक्षण आणि न्यायालयीन कामाचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणार आहे.त्यामुळे तरुण होतकरू वकिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्वाचे मानले जात आहे.त्यामुळे जास्तीत जास्त वकील या संधीचा लाभ घेऊन देशाच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये…

Read More

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात 1 हजार 400 नवीन आपले सरकार सेवा केंद्र वाटपासाठी यापूर्वी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया सध्याच्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली आहे. नवीन शासन निर्णयानुसार सुधारित निकष व अटी-शर्ती लागू झाल्याने नव्याने निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वीच्या जाहिरनाम्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 400 केंद्रांच्या वाटपासाठी एकूण 3 हजार 617 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाची छाननी करून प्रारूप यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर हरकती घेऊन मुलाखती घेण्याचे नियोजन प्रस्तावित होते. दरम्यान, 9 जुलै रोजी आपले सरकार सेवा केंद्र’ वाटपाबाबत नवीन शासन निर्णय प्राप्त झाला आहे. या निर्णयातील सुधारित निकष व अटी-शर्ती…

Read More

कोल्हापूर, दि.19 (जिमाका): श्री अंबाबाई मंदिर परिसरात सुरु असणारी सर्व कामे दर्जेदार करा. गरुड मंडपाचे काम शक्य तितक्या गतीने करा. गरुड मंडपाच्या सिलिंग पर्यंतची कामे नवरात्री पूर्वी पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिल्या. श्रीअंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव वर्षा साळुंखे, पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, व्यवस्थापक महादेव दिंडे, उपअभियंता सुयश पाटील, कॉन्ट्रॅक्टर चंदुलाल ओसवाल, कन्सल्टंट योगेश कासार -पाटील आदी उपस्थित होते. अंबाबाई मंदिराला भेट देऊन गरुड मंडपाच्या नूतनीकरण कामाच्या सद्यस्थितीबाबत वेळोवेळी पाहणी केली जाईल.…

Read More

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी जिल्हा गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये जिल्ह्यातील एकूण 203 उद्योक घटकांमार्फत 6 हजार 105 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात येणार असून या माध्यमातून 20 हजार 835 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आयुक्त (उद्योग) आयुक्तालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या परिषदेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नवीन उद्योगांची स्थापना, विद्यमान उद्योगांचा विस्तार तसेच विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमुळे स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. ही परिष्ज्ञद 21 ऑगस्ट रोजी सकाळी…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा येथे दि. 17 व 18 ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र चोपडाई देवीची श्रावण षष्ठी यात्रा होत आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक मोटार वाहनांनी जोतिबा डोंगरावर येत असतात. जोतिबा डोंगरावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 33 (1) (क) अन्वये वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत. जोतिबा डोंगरावरील वाहनांची संख्या, उपलब्ध पार्किंग व्यवस्था तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रमुख मार्गांवर वाहनांचे पार्किंग झाल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दानेवाडी फाटा क्रॉसिंग…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 3 या वेळेत आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल, ता. भुदरगड येथे नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 34 खासगी उद्योजकांकडून 3 हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, आय.टी.आय, डिप्लोमा तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्रता असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तसेच स्वयंरोजगार करू इच्छ‍िणाऱ्या उमेदवारांकरीता व‍िव‍िध प्रकारची महामंडळे उदा. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा…

Read More

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने तालुका प्रशासनामार्फत महिन्याच्या तिस-या सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय आजरा येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी लेखी स्वरुपात तक्रारी दोन प्रतीत सादर कराव्यात, असे आवाहन आजरा तहसिलदार समीर माने यांनी केले आहे. 0000

Read More