Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार योग्य तो कौशल्य विकास अभ्यासक्रम निवडता यावा आणि त्यांचे प्रभावी पुनर्वसन व्हावे यासाठी तुळशी हॉल, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे 25 मार्च रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत जिल्हास्तरावर समुपदेशन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातील तज्ज्ञ समुपदेशक, अधिकारी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी या शिबीरासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत करण्यात आले. 0000
कोल्हापूर (प्रतिनिधी): केआयटी (KIT) कॉलेजमधील एका विभागप्रमुख प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, कॉलेजमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी ‘हिंदू एकता आंदोलन’तर्फे करण्यात आली आहे. आज, मंगळवारी दुपारी १२:३० वाजता हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दिपक सुरेशराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक (SP) योगेश कुमार यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले. यावेळी बोलताना दिपक देसाई म्हणाले की, “या प्रकरणात पीडित मुलींनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही ६ मार्च रोजी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मात्र, संबंधित प्राध्यापकाची वर्तणूक…
कोल्हापूर, दि. १० : जिल्ह्यात पीएम किसान पोर्टलवर नोंद झालेल्या एकूण ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांपैकी १ लाख ८२ हजार शेतकऱ्यांच्या ॲग्रीस्टॅक नोंदी प्रलंबित आहेत. या सर्व नोंदी येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालींधर पांगारे, कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, नामदेव परीट यांच्यासह तालुका कृषी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि सहायक निबंधक ऑनलाइन स्वरूपात उपस्थित होते. कोणताही कृषिविषयक लाभ यापुढे ॲग्रीस्टॅक नोंदीशिवाय मिळणार नाही. तसेच आता कर्जमाफी झाल्याने अनेक…
कोल्हापूर/गारगोटी, दि. ९ : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ आणि ‘जिल्हास्तरीय HPV लसीकरण मोहिमेचा’ आज उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत व तज्ज्ञ आरोग्यसेवा देण्याचा उद्देश यामागे आहे. या अभियानांतर्गत CSR उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पाच शासकीय रुग्णालयांमध्ये दि. ९ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील सुमारे…
कोल्हापूर/गारगोटी, दि. ९ : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यात ‘मोफत सर्व शस्त्रक्रिया अभियान’ आणि ‘जिल्हास्तरीय HPV लसीकरण मोहिमेचा’ आज उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत व तज्ज्ञ आरोग्यसेवा देण्याचा उद्देश यामागे आहे. या अभियानांतर्गत CSR उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील पाच शासकीय रुग्णालयांमध्ये दि. ९ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत विविध गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील सुमारे…
कोल्हापूर, दि. 7 : शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथील चैतन्य बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या व्यवस्थापनात निर्माण झालेल्या कायदेशीर पेचप्रसंगामुळे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तारण असलेली शाळेची इमारत वित्तीय संस्था अॅक्सीलो फिनसर्व्ह यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरोधात संस्थेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शाळेचे शैक्षणिक कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासक नियुक्त करण्याचे निर्देश दिले. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करावे आणि पालकांना परिस्थितीची माहिती द्यावी,…
कोल्हापूर दिनांक 06- जुना बुधवार व शनिवार पेठ परिसरातील नॅशनल हायवे वरील वाहतुक कोंडी थांबविणेसाठी पर्यायी वाहतुक मार्गाचा प्रस्ताव मंजूर करून यासाठी आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून लवकरात लवकर पर्यायी वाहतुक मार्ग करावा या मागणीसाठी आज जुना बुधवार पेठ रस्ते सुरक्षा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनातून मागणी करण्यात आली आहे की “जुना बुधवार व शनिवार पेठेतून नागपूर ते रत्नागिरी असा नॅशनल हायवे अत्यंत दाटीवाटीच्या नागरी वस्तीतून जात असून या हायवेवरून अवजड वाहने, ऊसाने भरलेले ट्रक व ट्रॅक्टर त्याच बरोबर नोकरदार वर्ग यांची दुचाकी वाहने तसेच पर्यटकांच्या गाड्यांची वर्दळ प्रमाणापेक्षा जास्त वाढलेली आहे. त्यामुळे स्थानिक…
कोल्हापूर दि. 4 (जिमाका): राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी व वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी https://hmas.mahait.org या शासनाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर प्रवेश अर्ज मागविण्याबाबत वेळापत्रक देण्यात आले आहे. शासकीय वसतीगृह पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सन 2025-26 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे- बी.ए./बीकॉम/बी.एस.सी. अशा 12 वी नंतरच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी – 25 फेब्रुवारी ते 10 मार्च, पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करणे व…
कोल्हापूर दि :4 (जिमाका) केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने लवकरच जनगणनेचा कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येत आहे.या जनगणनेच्या कामासाठी संबंधित अधिकारी-कर्मचारी यांनी हे काम निर्धारित वेळेत व अचूकरित्या पूर्ण करण्यासाठी दक्ष असावे,असे आवाहन जनगणना सहाय्यक निदेशक वीरेंद्र दीक्षित यांनी केले . जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने चार ते सहा मार्च या कालावधीत संबंधित अधिकाऱ्यांचे तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे .या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी नंदू परळकर…
कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 16 मार्चपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेटचा वापर हा केवळ कायदेशीर बंधन नसून स्वतःचा जीव वाचविण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट योग्य पद्धतीने (पट्टा घट्ट बांधून) वापरणे अत्यावश्यक आहे. वाहन चालविताना चालकासह मागील…