Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, [दिनांक] – कोल्हापूरचे सुपुत्र मेधप्रणव बाबासाहेब पोवार यांच्यासाठी चित्रपट दिग्दर्शन आणि निर्मिती हा केवळ व्यवसाय नसून, अभिव्यक्तिचं परिणामकारक आणि सर्वोच्च माध्यम आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे कोल्हापूरचे नाव देशाच्या नकाशावर कोरणाऱ्या मेधप्रणव ने पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. संपूर्णपणे कोल्हापूरात चित्रित झालेला त्याचा नवीन लघुपट ‘तत् त्वं असि’ जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसेस पात्र ठरत आहे. ‘तत् त्वं असि’ अर्थात “ते तूच आहेस” – ही एक आत्मशोधाची भावपूर्ण कथा आहे. परदेशी स्थलांतरित झालेल्या पण आपला वारसा मारणोपरांतही जपला जावा अशी इच्छा असलेल्या एका भारतीय स्थलांतरिताची आणि त्याच्या मुलाची ही कथा आहे. वडिलांच्या निधनानंतर, त्यांच्या शेवटच्या काही इच्छा…
कोल्हापूर दि : 2 (जिमाका) शुल्लक कारणावरून घटस्फोट घेण्याचे प्रमाण हल्ली अधिक वाढत आहे .यामध्ये पती – पत्नीने सामंजस्याने वागणे आवश्यक आहे .कौटुंबिक न्यायालय हे विस्थापित कुटुंबाला जोडण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम म्हणून काम करते. खऱ्या अर्थाने ते दुवा आहे असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश अपर्णा वाईकर यांनी केले . कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयातील राजर्षी शाहू सभागृहामध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, कौटुंबिक न्यायालय बार असोशिएशन आणि कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावा वर्धापन दिन सोहळा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या . व्यासपीठावर तांबे एस.एस जिल्हा न्यायाधीश – 4 तथा सदस्य कौटुंबिक न्यायालय सल्लागार समिती, बार असोसिएशन अध्यक्ष व्ही आर पाटील…
कोल्हापूर, दि.०२ : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा ‘लोकशाही दिन’ आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित मुदतीत निरसन करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. आजच्या लोकशाही दिनामध्ये एकूण १२२ अर्ज प्राप्त झाले. यामध्ये महसूल विभागाशी संबंधित ३८ अर्जांचा समावेश आहे. महसूल शाखेंतर्गत करवीर तहसील कार्यालयाकडे ५, पन्हाळा तहसील कार्यालयाकडे ११, तर इतर महसूल कार्यालयांकडे २२ अर्ज प्राप्त झाले आहेत. इतर शासकीय विभागांकडे एकूण ८४ अर्ज प्राप्त झाले असून , त्यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संबंधित सर्वाधिक १९ अर्जांची नोंद झाली आहे. तसेच जिल्हा परिषदेकडे १८, भूमी अभिलेख विभागाकडे १०,…
कोल्हापूर, दि. २* : जनगणना ही पुढील दोन दशकांसाठी देशाची ध्येयधोरणे आणि भविष्यातील नियोजनाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे माहितीची गुणवत्ता आणि सत्यता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र राज्याच्या जनगणना संचालिका डॉ. निरुपमा डांगे यांनी व्यक्त केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली आगामी जनगणनेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर ‘जिल्हा जनगणना कार्यालयाचे’ उद्घाटन त्यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर आयोजित मुख्य आढावा बैठकीत त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी तथा प्रमुख जिल्हा जनगणना अधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजानन गुरव, उपसंचालक जनगणना प्रवीण भगत, तहसीलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह…
नवी मुंबई, दि. २८ : “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांसाठी भव्य लंगरची व्यवस्था करण्यात आली आहे. लाखो भाविक या लंगर सेवेचा लाभ घेत असून संपूर्ण परिसर सेवाभाव आणि समतेच्या संदेशाने भारावून गेला आहे. आज पहिल्या दिवशी अंदाजे दोन लाखांपेक्षा अधिक भाविक लंगर सेवेचा लाभ घेतील अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. कार्यक्रमस्थळी सकाळपासून रात्रीपर्यंत अखंड लंगर व्यवस्था सुरू असून सर्व धर्मीय भाविकांना भोजन दिले जात आहे. संपूर्ण परिसरात आठ ठिकाणी लंगर सुरू असून एका वेळेस एका लंगर मध्ये सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांना एकत्रितपणे भोजनाची…
नवी मुंबई दि 28 फेब्रुवारी : मानवतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे शिख पंथाचे नववे गुरू गुरू तेगबहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम निमित्त खारघर येथे भव्य जनकल्याण चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी कोश यांच्या सौजन्याने आयोजित या उपक्रमास देशभरातून आलेल्या भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समागमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या आरोग्याची सर्वंकष काळजी घेत विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत बहुआयामी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. शिबिरात फिजिओथेरपी सेवा कक्ष, दंतरोग तज्ञ कक्ष, अस्थिरोग तज्ञ कक्ष, कान-नाक-घसा तज्ञ कक्ष, हृदयरोग तज्ञ कक्ष, मेडिसिन विभाग, तसेच ईसीजी व रक्तदाब तपासणी कक्ष यांचा समावेश होता. विशेष म्हणजे…
कोल्हापूर दिनांक 27- मराठा क्रांती मोर्चातील अमूल्य योगदानाची दखल घेत, सागर धनवडे यांची आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय प्रवक्ता पदी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे,डॉ.कृषीराज टकले पाटील यांनी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. या नियुक्तीबद्दल बोलताना राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य भूषण मराठा रत्न डॉ.सागर काळे यांनी विश्वास व्यक्त केला की, सागर धनवडे यांच्या अनुभवामुळे संघटनेला मोठी ताकद मिळेल. याप्रसंगी राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय सचिव चैतन्य रावल, राष्ट्र स्वाभिमानी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल, राष्ट्र स्वाभिमानी इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष इतिहास संशोधक रवींद्र राजे जगदाळे, राष्ट्र स्वाभिमानी इतिहास आघाडी आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष इंद्रजित घोरपडे गजेंद्रगडकर…
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व राखीव. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांच्यासाठी राखीव. (स्थळ-निवासस्थान कागल). सकाळी 10 ते 5 पर्यंत राखीव. सायंकाळी 5 वाजता पहिला राष्ट्रीय बौध्दधम्म मेळावा, कागल येथे उपस्थिती. (स्थळ- गैबी चौक, कागल). सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम (स्थळ-निवासस्थान, कागल). रविवार, दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांच्यासाठी राखीव (स्थळ-निवासस्थान, कागल). सकाळी 10 ते 3 वाजता राखीव (स्थळ-निवासस्थान, कागल). दुपारी 3 वाजता…
भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रविवारी १ मार्च रोजी कोल्हापुरात आगमन होत आहे. यानिमित्त त्यांचे करवीर नगरीत दुचाकी रॅलीने जल्लोषी स्वागत करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधी खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये २ हजार दुचाकी स्वारांची रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांचे सुपूत्र कृष्णराज महाडिक हे गेल्या पाच वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची ओळख दूरवर पसरली आहे. यापुर्वी त्यांनी फॉर्म्युला थ्री या आंतरराष्ट्रीय कार रेसिंगमध्ये उज्वल कामगिरी करत देश-विदेशातील लाखो नागरिकांची मने जिंकली आहेत. सर्वच क्षेत्रात खर्या अर्थाने युथ आयकॉन…
कोल्हापूर दि :27 (जिमाका) लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ऊसतोड कामगारांच्या आर्थिक प्रश्नांच्या अनुषंगाने असणाऱ्या सुमारे 19 प्रकरणांना आज मंजुरी देण्यात आली . यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी , उर्वरित सात प्रस्तावांच्या त्रुटींची पूर्तता पूर्ण करून ते प्रस्ताव पुन्हा बैठकीत सादर करावेत असे निर्देश देवून ऊसतोड कामगारांच्या अनुषंगाने आता सर्वेक्षण करता येईल का ? याबाबत राज्याकडून मार्गदर्शन मागवावे अशी सूचना ही या बैठकीत केली. प्रारंभी ऊसतोड कामगाराच्या प्रलंबित प्रश्नांबाबत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आढावा सादर केला. या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे…