Author: admin

कोल्हापूर, दि. 7 : केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सन 2025-26 या वर्षात जिल्ह्यास 415 लक्षांक देण्यात आला होता. त्यापैकी तब्बल 432 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना मंजुरी मिळाली असून, जिल्ह्याने 104 टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून कोल्हापूरने राज्यातील इतर जिल्ह्यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले आहे. अमरावती जिल्हा दुसऱ्या, जालना तिसऱ्या, अहिल्यानगर चौथ्या आणि पुणे पाचव्या क्रमांकावर आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या सूक्ष्म उद्योगांना बळकटी देणे, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहायता गट, महिला गट, नवउद्योजक…

Read More

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : पन्हाळा तालुक्यातील कोडोलीचे माजी सैनिक ऑनररी कॅप्टन संदीप बाबासाहेब जाधव यांना 7 एप्रिल रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत्त) यांच्या हस्ते कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित महाराष्ट्र गौरव पुरस्कारा अंतर्गत रुपये पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.  ऑनररी कॅप्टन जाधव संदीप बाबासाहेब यांनी 7 एप्रिल 2014 रोजी कुपवाडा येथे अतिरेक्यांशी झालेल्या कारवाईमध्ये मध्ये एका अतिरेक्याला ठार केले होते. त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाबददल 26 जानेवारी 2015 रोजी            त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. संदीप बाबासाहेब जाधव हे 30 एप्रिल 2024 रोजी सेवानिवृत्त झाले…

Read More

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथे रोजगार मेळाव्यासाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कामाचा अंदाजित खर्च 8 लाख 50 हजार रुपये (11 महिन्यासाठी) रुपये व कार्यालयीन स्टेशनरीसाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कामाचा अंदाजित खर्च रूपये 1 लाख (11 महिन्यासाठी) असा एकूण 9 लाख 50 हजार रूपये कामाचा अंदाजित खर्च आहे. वरील कामे करवीर तालुक्यातील असून याप्रमाणे कामे करण्यास इच्छुक तालुका, कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणा-या कार्यरत व अटी व शर्ती पूर्ण करणा-या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून मे 2026 ते मार्च 2027 या कालावधीसाठी नमूद कंत्राटी कामासाठी दरपत्रकासह दिनांक 13 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे…

Read More

मुंबई, दि. ७ एप्रिल : जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्व विभागाचे मंत्री यावेळी उपस्थित होते. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी या अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. त्यानंतर अभियानाविषयी माहिती देण्यात येणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या…

Read More

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक-युवती व इतर उमेदवारांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहे. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा घटकांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था कार्यरत आहे. अमृतच्या लक्षित गटामध्ये सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी आणि कोमटी/वैश्य अशा 25 जातींचा समावेश आहे. सर्वेक्षणानंतर या गटात आणखी वाढ होण्याची शक्यता…

Read More

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 8 ते 14 एप्रिलपर्यंत विभागातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, निवासी शाळा तसेच जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रबोधनात्मक व्याख्याने, विविध योजनांच्या कार्यशाळा, तसेच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वाटप करणे, ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान इ. सामाजिक उपक्रम व कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याकरिता जिल्ह्यातील सर्व शिव- फुले-शाहू-आंबेडकर अनुयायी, कार्यकर्ते, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार व नागरिकांनी सर्व कार्यक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0231-2651318 या क्रमांकावर…

Read More

कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-HG दि. 8 एप्रिल पासून सुरु करण्यात येत असून संबंधित वाहन चालकांच्या पसंती क्रमांकाचे अर्ज 8 व 9 एप्रिल रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत खिडकी क्र. 9 येथे स्विकारण्यात येतील. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत शासनाने विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्विकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच…

Read More

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 7 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 18 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती…

Read More

कोल्हापूर, दि. 02 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहु महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ताज्या घडामोडी मध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे. वरील संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या सुस्पष्ट व वाचनीय कागदपत्रांसह 15 मे पर्यंत सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत व त्याची प्रत समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, 3 चर्चरोड, पुणे – 411001 येथे सादर करावी. DG Locker…

Read More

कोल्हापूर, दि. 02 : मौजे मोघर्डे, ता. राधानगरी हद्दीतील दुधगंगा डावा कालवा कि.मी. 13 सा.क्र. 12/200 मी. येथील नादुरुस्त गेटमुळे पाणी वाया जात असल्याबाबत आपले सरकार पोर्टलवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, संबंधित गेट दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचा खुलासा दुधगंगा डावा कालवा उपविभाग क्र. 2, तिटवे यांच्या वतीने करण्यात आला आहे. या अनुषंगाने यांत्रिकी विभाग, कोल्हापूर कार्यालयामार्फत आवश्यक निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. गेट दुरुस्तीचे काम करताना झडप द्वार बसविण्यासाठी विद्यमान संधानकाचे बांधकाम काढणे, झडप द्वार बसविणे आणि त्यानंतर बांधकाम पूर्ववत करणे आवश्यक असल्याने सदर कामाचा समावेश दुधगंगा प्रकल्पाच्या सन 2025-26 च्या…

Read More