
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर येथे रोजगार मेळाव्यासाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कामाचा अंदाजित खर्च 8 लाख 50 हजार रुपये (11 महिन्यासाठी) रुपये व कार्यालयीन स्टेशनरीसाठी 11 महिन्यांच्या कालावधीसाठी कामाचा अंदाजित खर्च रूपये 1 लाख (11 महिन्यासाठी) असा एकूण 9 लाख 50 हजार रूपये कामाचा अंदाजित खर्च आहे. वरील कामे करवीर तालुक्यातील असून याप्रमाणे कामे करण्यास इच्छुक तालुका, कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्र असणा-या कार्यरत व अटी व शर्ती पूर्ण करणा-या बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून मे 2026 ते मार्च 2027 या कालावधीसाठी नमूद कंत्राटी कामासाठी दरपत्रकासह दिनांक 13 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे.
*अटी व शर्ती -*
बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट,2000 नंतर झालेली असावी. तसेच
सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस रू. 10 लाखापर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक/राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमीत वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2024-25 च्या लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी/लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना ओळखपत्र देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशील नसतील त्यांची नावे या सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्याठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या छायांकीत प्रती/प्रमाणपत्र मुळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. हे काम करवीर तालुक्यातील असल्याने तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असणा-या या कार्यालयाकडे नोंदणीकृत कार्यरत संस्थांनी प्रस्ताव दरपत्रकासह बंद लखोट्यात सादर करावेत. अर्ज/प्रस्तावासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकीत प्रत जोडावी. संस्था अवसायानात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये.
अटी पूर्ण करणा-या कार्यरत सेवा सहकारी संस्था यांनी उपरोक्त तक्त्यातील कंत्राटी कामासाठी सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर यांच्या नावे 13 एप्रिलपर्यंत दरपत्रकासह प्रस्ताव सादर करावेत.
0000