
कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : पन्हाळा तालुक्यातील कोडोलीचे माजी सैनिक ऑनररी कॅप्टन संदीप बाबासाहेब जाधव यांना 7 एप्रिल रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत्त) यांच्या हस्ते कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थित महाराष्ट्र गौरव पुरस्कारा अंतर्गत रुपये पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
ऑनररी कॅप्टन जाधव संदीप बाबासाहेब यांनी 7 एप्रिल 2014 रोजी कुपवाडा येथे अतिरेक्यांशी झालेल्या कारवाईमध्ये मध्ये एका अतिरेक्याला ठार केले होते. त्यांनी दाखवलेल्या पराक्रमाबददल 26 जानेवारी 2015 रोजी
त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. संदीप बाबासाहेब जाधव हे 30 एप्रिल 2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
0000