
कोल्हापूर, दि. 02 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहु महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर ताज्या घडामोडी मध्ये विस्तृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
वरील संकेतस्थळावरुन अर्ज डाऊनलोड करुन तो परिपुर्ण व आवश्यक त्या सुस्पष्ट व वाचनीय कागदपत्रांसह 15 मे पर्यंत सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत व त्याची प्रत समाजकल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, 3 चर्चरोड, पुणे – 411001 येथे सादर करावी.
DG Locker व्दारे आवश्यक ती सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करणे बंधनकारक राहिल. अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडी या लिंकवर जाऊन भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
0000