Author: admin

14 एप्रिल हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र शासन तसेच देशातील विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘विश्वरत्न’, ‘भारतरत्न’, ‘घटनाकार’ आणि ‘भारत भाग्यविधाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ राष्ट्र म्हणून बांधून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले.त्यामुळेच त्यांच्या जयंती दिनी संपूर्ण देशात त्यांना आदरांजली व्यक्त केली जाते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतची जनता आजच्या दिवशी महामानवापुढे नतमस्तक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान व त्यावर आधारित लोकशाही जोपर्यंत भारतात आहे, एकसंघ भारतासाठी कायद्याची पोलादी…

Read More

“एक स्त्री शिकली, तर पूर्ण कुटुंब शिकते,” हे ब्रीदवाक्य आपण अनेक दशकांपासून ऐकत आलो आहोत. मात्र, 21 व्या शतकातील भारतात महिला सक्षमीकरण ही संकल्पना केवळ साक्षरतेपुरती मर्यादित राहिलेली नाही. आज सक्षमीकरण म्हणजे महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, संसाधनांवरील समान हक्क, सुरक्षिततेची हमी आणि समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देणारी व्यापक सामाजिक प्रक्रिया होय. महिला सक्षमीकरण केवळ घोषणांमधून साध्य होत नाही; त्यासाठी शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक समानता, आरोग्य, सुरक्षा आणि मानसिकतेत सकारात्मक बदल आवश्यक आहे. महिला सक्षमीकरणाचा सर्वात भक्कम पाया म्हणजे शिक्षण आणि कौशल्य विकास. प्रत्येक मुलीला शालेय, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाची समान संधी मिळणे अत्यावश्यक आहे. शिक्षणामुळे स्त्रीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो…

Read More

कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सुधारित दौरा पुढीलप्रामणे -सोमवार, 13 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगनम व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल) मंगळवार, 14 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 9.30 वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कागल) सकाळी 10 वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित. (स्थळ: शाहू कॉलनी, कागल) सकाळी 11.30 वाजता बिद्री, ता. कागल येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: बिद्री,…

Read More

कोल्हापूर दि 13 (जिमाका) गारगोटी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहात महात्मा ज्योतिराव फुले यांची 200 वी जयंती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी गृहपाल सविता कांबळे व तालुका समन्वयक सुरेखा डवर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख व्याख्यात्या सुरेखा डवर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या विषयी बोलताना सांगितले की , फुले यांनी तत्कालीन समाजात समता,बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करण्यावर भर दिला तसेच त्यांचे विचार हे मानवतेचा व प्रगतीचा मार्ग दाखवणारे असल्याचे म्हणाल्या . यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनी आरती कांबळे हिने आपले समयोचित विचार व्यक्त केले…

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महाडच्या चवदार तळ्याचे शताब्दी वर्ष, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेले बहुमोल कार्य व महापुरुषांच्या विचारातून आजच्या युवकांचे योगदान या विषयावर विवेकानंद महाविद्यालय येथे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. जगन कराडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.कराडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून लोकांनी शिका, चेतवा व संघटित व्हा या…

Read More

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षामधील 25 टक्के कोट्यातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील 315 शाळांमधील 3361 जागांसाठी एकूण 5328 ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. ज्या शाळांना 25% आरक्षित क्षमतेपेक्षा जादा अर्ज आलेले आहेत, अशा शाळांसाठी शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून राज्यस्तरावर 6 एप्रिल रोजी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया घेण्यात आलेली आहे. लॉटरीद्वारे पहिल्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी, तसेच पुढील प्रवेश फे-यांसाठी प्रतिक्षा यादी निश्चित करून RTE पोर्टलवरील होमपेजवर अपलोड करण्यात येत आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेचा…

Read More

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी…

Read More

कोल्हापूर, दि. 10 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महाडच्या चवदार तळ्याचे शताब्दी वर्ष, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेले बहुमोल कार्य व महापुरुषांच्या विचारातून आजच्या युवकांचे योगदान या विषयावर विवेकानंद महाविद्यालय येथे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. जगन कराडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.कराडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून लोकांनी शिका, चेतवा व संघटित व्हा या…

Read More

जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धारी, या एका कवितेच्या ओळी साऱ्यांनाच अवगत असल्या, तरी आपल्या देशात महिलांचा विविध क्षेत्रातील सहभाग हा तसा मर्यादितच राहिला आहे. केवळ साहित्य किंवा इतिहासातील चार- दोन दाखले देऊन हा विषय संपत होता. त्यामुळेच भारतात महिलांचे सशक्तीकरण हा केवळ चर्चेचा विषय होता. शहरी भागात शिक्षणाच्या सुविधांमुळे थोडी बरी स्थिती असली, तरी ग्रामीण भागात मात्र विदारक परिस्थिती होती. मात्र २०१४ नंतर देशात हे चित्र बदलायला सुरुवात झाली. देश सशक्त व्हायचा असेल, तर स्त्री सशक्त झाली पाहिजे हे स्वप्न पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य दिले आणि त्यासाठी विविध योजना आणून त्याची अंमलबजावणीही सुरू केली.…

Read More

पोदार इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष “Narcotics Awareness Program” चे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज व अँटी नार्कोटिक टास्क फोर्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या शिल्पा कपूर, उपप्राचार्या मनीषा अंब्राळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज च्या अध्यक्षा रोटेरियन पूजा गांधी तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते. यानंतर रोटेरियन पूजा गांधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यापासून दूर राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर अँटी नार्कोटिक टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत विविध…

Read More