Author: admin

कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : परिवहन विभागातील मालवाहतूक वाहनांसाठी जुनी नोंदणी मालिका MH-०९-GJ ही लवकरच संपणार आहे. त्यानंतर नवीन मालवाहतूक नोंदणी मालिका MH-०९-HK करिता 7 सप्टेंबरपासून कामकाज सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज 7 सप्टेंबर रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत परिवहन विभाग खिडकी क्रमांक 2 येथे स्विकारण्यात येतील. वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करते वेळी खालील सुचनांचे पालन करावे- पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पेऑर्डर अर्जासोबत देवू नये. डिमांड ड्राफ्ट काढताना REGIONAL TRANSPORT OFFICE KOLHAPUR या नावानेच काढलेला असावा.…

Read More

कोल्हापूर, दि. ३ (जिमाका): केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नात्यांतर्गत दत्तक व सावत्र पालक दत्तक प्रक्रियेतील ८ प्रकरणांना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मान्यतेने गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यामुळे संबंधित पालकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेद्वारे बालकांचे पालकत्व प्राप्त झाले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्षाने ही प्रक्रिया पूर्ण केली. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची प्रथम CARA संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आली. दत्तक घेणारे व दत्तक देणारे पालक तसेच संबंधित बालकांची आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यांची छाननी करण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर दाते यांनी दत्तक…

Read More

कोल्हापूर, दि. 3 : जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुसज्ज व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने 15 व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रासाठी 61 रु. लाख इतका निधी उपलब्ध होणार असून, एकूण अंदाजे 18 कोटी 91 लाख रु. इतका निधी या कामांसाठी उपलब्ध होणार आहे. आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून…

Read More

कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र, बालिंगामार्फत सांगरुळ येथे महिलांना रोजगार निर्मितीकरीता जिल्हा नियोजन समिती व नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पातून कोल्हापूरी चप्पल युनिट उभारण्यात आले आहे. या युनिटचे उ‌द्घाटन शुक्रवार, 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे व विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती माविमतर्फे देण्यात आली आहे. या कोल्हापुरी…

Read More

*मुंबई, दि. 3 सप्टेंबर :* महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या हौशी नाट्य स्पर्धांमध्ये स्थानिक कलाकारांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने स्पर्धेच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य ॲड. आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे स्थानिक हौशी कलाकारांचे स्पर्धेतील हक्काचे व्यासपीठ अधिक सक्षम होणार आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवांतर्गत हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य तसेच दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचे आयोजन राज्यातील २४ केंद्रांवर करण्यात येते. नव्याने करण्यात आलेल्या नियमावलीतील सुधारणेनुसार, स्पर्धेत सहभागी होणारा कलाकार संबंधित स्पर्धा केंद्राच्या जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत शासनाने हौशी नाट्य…

Read More

कोल्हापूर दि : 3 कागल तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व अन्न व औषध प्रशासन (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांसाठी एकदिवसीय तालुकास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बहुउद्देशीय सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी गटशिक्षण अधिकारी सारिका कसोटे होत्या. याप्रसंगी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ व्ही.ए आरळेकर यांनी ‘तंबाखूमुक्त शाळा’ अभियानांतर्गत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी कोटपा (COTPA) कायदा २००३, शाळा परिसरातील १०० यार्ड नियमाचे तंतोतंत पालन, शालेय तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना आणि तंबाखूमुक्त शाळेचे ९ निकष यावर सविस्तर माहिती देवून बालपण व्यसनमुक्त ठेवण्यासाठी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांनी आपली भूमिका सक्रियपणे बजावावी, असे आवाहन केले…

Read More

कोल्हापूर दि:2 (जिमाका) येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण राज्यात रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये सुमारे 18 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे . या रोजगार मेळाव्याच्या सुयोग्य व प्रभावी नियोजनाकरिता कोल्हापूर जिल्हा रोजगार मेळावा समन्वय समितीची शिवाजी तंत्रनिकेतन विद्यालय येथे आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम म्हणाले , राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन हा राज्य शासनाचा अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम असून या महाकुंभ मेळाव्याला अधिकाधिक युवकांनी आपला सहभाग नोंदवावा यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावेत. या मेळाव्याच्या अनुषंगाने…

Read More

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): महसूल प्रशासनातील प्रलंबित अर्धन्यायिक (Quasi-Judicial) प्रकरणे जलदगतीने व तडजोडीने निकाली काढण्यासाठी राज्यात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान 2026’ राबविण्यात येत आहे. हे अभियान 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित विविध महसुली दावे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असतात. या प्रकरणांमध्ये एका स्तरावर निकाल लागल्यानंतर असंतुष्ट पक्षकारांकडून वरिष्ठ न्यायालयात अपील अथवा पुनरीक्षण अर्ज दाखल केला जात असल्याने प्रकरणे…

Read More

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : महाराष्ट्रात सन 2047 पर्यंत 300 कोटी वृक्षारोपण मोहिम व इतर हरित पायाभूत सुविधा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘हरित महाराष्ट्र आयोग’ स्थापन करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून उद्दिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात केवळ 1 लाख 92 हजार वृक्ष लागवड झाली आहे. अनेक यंत्रणांचा या मोहिमेत प्रतिसाद दिसून येत नाही. याची दखल घेवून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व यंत्रणांनी त्यांना दिलेली उद्दिष्टपूर्ती या पावसाळ्यात करावी, असे निर्देश दिले. जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यासाठी सन 2026 च्या पावसाळ्यात 5 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सर्व संबंधित विभागांना…

Read More

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका): बाबुराव लक्ष्मण दिंडे व प्रतिक बाबुराव दिंडे, रा.उजळाईवाडी, ता. करवीर यांच्याकडून एकूण रक्कम 7 लाख 50 हजार रुपये इतकी रक्कम वसुल करण्याकरिता टाटा हिताची EX 110 क्रमांक 07230586 पोकलँड जप्त करण्यात आले आहे. विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण रक्कम रू. 7 लाख 50 भरली नाही तर नमुद केलेली मालमत्ता तहसिल कार्यालय करवीर येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता किंवा दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जाहीर लिलावाने विकली जाईल. ही विक्री उक्त कसुरदारांचे उक्त संपत्तीवरील अधिकार, हक्क आणि हित संबंध यांच्या पुरतीच मर्यादित आहे. लिलावाच्या शर्ती पुढीलप्रमाणे- टाटा हिताची EX ११० क्रमांक ०७२३०५८६ पोकलँड मालमत्तेचे मुल्यांकन…

Read More