Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर , १४ सप्टेंबर : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने गणेशोत्सवातील कला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाला जागतिक स्तरावर डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ‘जागर कलेचा, समृद्ध परंपरेचा..!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा महाराष्ट्रासह भारतातील आणि जगभरातील स्पर्धकांसाठी खुली आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेनुसार तसेच सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागतिक महागणेशोत्सव रील स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले असून १४ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही स्पर्धा राबविण्यात येणार…
कोल्हापूर, दि. १५ (जिमाका): अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी २.० या नवीन प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी भरून घेण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र माने यांनी केले आहे. महाडीबीटी २.० पोर्टलवर इयत्ता ९ वी व १० वीतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता ५ वी ते १० वीतील अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, माध्यमिक…
कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री मा. अमित शहा हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, 19 सप्टेंबर रोजी सायं. 5.05 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सायं. 5.10 वाजता शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं. 5.20 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सायं. 5.20 पासून राखीव. (स्थळ : शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर) रविवार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह येथून हुपरीकडे प्रयाण. सकाळी 11.25 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना, हुपरी येथे आगमन. सकाळी 11.30 ते 1 वाजता महालक्ष्मी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्सचे भूमीपूजन आणि शेतकरी जनसभेसाठी राखीव. (स्थळ: कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर…
कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : दृष्टिहीन नागरिकांच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संस्थेला जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या स्वच्छेने निधी द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) जिल्हा शाखा, कोल्हापूर यांच्यामार्फत ध्वजनिधी 2026- संकलन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी श्री. राठोड म्हणाले, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) जिल्हा शाखा, कोल्हापूर ही संस्था गेली 36 वर्षापासून जिल्ह्यातील दृष्टिहीन नागरिकांसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते. तसेच त्यांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य करुन त्यांचे पुनर्वसन केले जाते. असे सांगून ते म्हणाले, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या…
कोल्हापूर, दि. १५ (जिमाका) : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंतच्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. कार्यालय प्रमुखांसह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोहिमेत वैयक्तिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. या मोहिमेत कार्यालय परिसरातील गवत, झुडपे व कचरा काढणे, कार्यालयाची स्वच्छता, दप्तराचे निंदणीकरण,सहा गठ्ठे पध्दती, अभिलेख कक्षातील सर्व दस्तऐवज सुव्यवस्थित लावून घेणे, जाळे-जळमटे व धूळ काढणे, तसेच अनावश्यक कागदपत्रे, निकामी साहित्य व इतर अनावश्यक वस्तुंची नियमानुसार विल्हेवाट लावणे…
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रामध्ये सण, समारंभ व उत्सवांच्या कालावधीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन, तपासणी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे किमान 7 दिवस अगोदर तपासणी दिनांकास दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सन 2026 साठी दोन स्वतंत्र संनियंत्रण समितींची नियुक्ती केली आहे. कोल्हापूर महानगरपालिका कोल्हापूरसाठी- मोसमी चौगुले, उपविभागीय अधिकारी करवीर उपविभाग, कोल्हापूर यांची अध्यक्ष तर किरण धनवडे, उपायुक्त, कोल्हापूर महानगरपालिका व प्रिया पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हापूर शहर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजीसाठी – दिपक शिंदे, उपविभागीय अधिकारी इचलकरंजी उपविभाग, इचलकरंजी यांची अध्यक्ष तर…
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका हद्दीच्या कार्यक्षेत्रामध्ये सण, समारंभ व उत्सवांच्या कालावधीमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडपांची तपासणी करुन, तपासणी अहवाल पुढील कार्यवाहीसाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे किमान 7 दिवस अगोदर तपासणी दिनांकास दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सन 2026 साठी 13 स्वतंत्र संनियंत्रण समित्या नियुक्त केल्या आहेत. वडगांव नगरपरिषद- सुमित जाधव, मुख्याधिकारी, वडगांव नगरपरिषद यांची अध्यक्ष तर विजय घेरडे, पोलीस निरीक्षक, वडगांव पोलीस ठाणे व कार्यालय अधिक्षक, वडगांव नगरपरिषद यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हुपरी नगरपरिषद – अजय नरळे, मुख्याधिकारी, हुपरी नगरपरिषद यांची अध्यक्ष तर सत्यवान हाके, पोलीस निरीक्षक, हुपरी पोलीस ठाणे…
गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य केले. महाराष्ट्र शासनाने १४ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’म्हणून घोषीत केल्यामुळे या उत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. परंतू हा उत्सव साजरा करताना नागरिकांची सुरक्षितता, कायद्याचे पालन, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे. आपल्या आनंदामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी भक्तिभाव कायम ठेवून शिस्तबद्ध रीतीने आणि सामाजिक भान जपून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे काळाची गरज आहे.. ! राज्य महोत्सवातून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश- राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानंतर यंदाच्या वर्षी हा…
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर कल्याण व पुनर्वसनाच्या दृष्टीने योजना व सवलतीची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथील कल्याण संघटक यांचा माहे सप्टेंबर 2026 चा मासिक दौरा आयोजित केला आहे. संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी केले आहे. कल्याण संघटकांचा दौरा पुढीलप्रमाणे- 10 सप्टेंबर रोजी दुसरा गुरुवार, तहसील कार्यालय, गडहिंग्लज येथे प्रकाश आनंदा गुरव, अ.सहा.व.अ. उपस्थित राहतील. 16 सप्टेंबर रोजी तिसरा बुधवार तहसील कार्यालय, चंदगड येथे सुहास कांबळे, कल्याण संघटक उपस्थित राहतील.…
कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : केंद्रीय रेशीम मंडळातर्फे मेरा रेशीम मेरा अभिमान उपक्रमांतर्गत क्षेत्रीय भेट व बिज कोष उत्पादन, अंडीपुंज उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व याविषयी कार्यक्रम दि अंडीपुंज उत्पादन केंद्र, गडहिंग्लज येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ डॉ. एन. चंद्रकांत यांनी विशेष तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी अंडीपुंज उत्पादन केंद्राचे प्रमुख डॉ. बी.एम. खंडागळे, कोल्हापूर जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पी. जी. निकम, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक एस. आर. पाटील, अंडीपुंज उत्पादन करणारे कामगार, बिज कोष उत्पादक शेतकरी, गडहिंग्लज कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. 0000