Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत बँक मंजुरी स्तरावर “Reject for Incomplete Documents” अर्थात अपूर्ण कागदपत्रांमुळे Reject स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या लॉगिनद्वारे पाहता येणार आहेत. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत केल्यानंतर संबंधित प्रकरण “Scrutiny” स्तरावर दिसेल. त्या ठिकाणी कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र प्रकरणांसाठी “Submit” पर्याय उपलब्ध होईल. “Submit” केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीसाठी मुख्यालयाकडे पाठविण्यात येईल व त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात, लाभार्थी व्याज परताव्यासाठी क्लेम सादर करत असताना कागदपत्रांमधील त्रुटींमुळे Hold स्थितीत असलेली प्रकरणे लाभार्थ्यांना त्यांच्या लॉगिनवर कारणांसह दिसतील. अशा…
कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे आणि डॉ. आंबेडकरांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रसार करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्याची व्याप्ती मोठी असली तरी, विशेषतः ‘महिलांविषयी केलेले कार्य आणि महिला सक्षमीकरणातील योगदान’ या विषयावर ही स्पर्धा केंद्रित असणार आहे. स्पर्धकांसाठी दोन गट निश्चित करण्यात आले असून निबंध केवळ मराठी भाषेत असणे अनिवार्य आहे. गट १ (ITI विद्यार्थी):…
मुंबई,दि.१३ : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन ८ तासांत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत. त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही. त्यामुळे उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहे. या प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षा कडून देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षभरापासून…
14 एप्रिल हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील प्रेरणादायी पर्व आहे. या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महाराष्ट्र शासन तसेच देशातील विविध संस्थांकडून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘विश्वरत्न’, ‘भारतरत्न’, ‘घटनाकार’ आणि ‘भारत भाग्यविधाता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ राष्ट्र म्हणून बांधून ठेवण्याचे ऐतिहासिक कार्य केले.त्यामुळेच त्यांच्या जयंती दिनी संपूर्ण देशात त्यांना आदरांजली व्यक्त केली जाते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतची जनता आजच्या दिवशी महामानवापुढे नतमस्तक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले संविधान व त्यावर आधारित लोकशाही जोपर्यंत भारतात आहे, एकसंघ भारतासाठी कायद्याची पोलादी…
“एक स्त्री शिकली, तर पूर्ण कुटुंब शिकते,” हे ब्रीदवाक्य आपण अनेक दशकांपासून ऐकत आलो आहोत. मात्र, 21 व्या शतकातील भारतात महिला सक्षमीकरण ही संकल्पना केवळ साक्षरतेपुरती मर्यादित राहिलेली नाही. आज सक्षमीकरण म्हणजे महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, संसाधनांवरील समान हक्क, सुरक्षिततेची हमी आणि समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळवून देणारी व्यापक सामाजिक प्रक्रिया होय. महिला सक्षमीकरण केवळ घोषणांमधून साध्य होत नाही; त्यासाठी शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक समानता, आरोग्य, सुरक्षा आणि मानसिकतेत सकारात्मक बदल आवश्यक आहे. महिला सक्षमीकरणाचा सर्वात भक्कम पाया म्हणजे शिक्षण आणि कौशल्य विकास. प्रत्येक मुलीला शालेय, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाची समान संधी मिळणे अत्यावश्यक आहे. शिक्षणामुळे स्त्रीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो…
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सुधारित दौरा पुढीलप्रामणे -सोमवार, 13 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगनम व मुक्काम. (स्थळ: निवासस्थान कागल) मंगळवार, 14 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ: निवासस्थान कागल) सकाळी 9.30 वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, कागल) सकाळी 10 वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित. (स्थळ: शाहू कॉलनी, कागल) सकाळी 11.30 वाजता बिद्री, ता. कागल येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: बिद्री,…
कोल्हापूर दि 13 (जिमाका) गारगोटी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय मुलींच्या वसतिगृहात महात्मा ज्योतिराव फुले यांची 200 वी जयंती व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती दिनानिमित्त सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी गृहपाल सविता कांबळे व तालुका समन्वयक सुरेखा डवर यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख व्याख्यात्या सुरेखा डवर यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या विषयी बोलताना सांगितले की , फुले यांनी तत्कालीन समाजात समता,बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार करण्यावर भर दिला तसेच त्यांचे विचार हे मानवतेचा व प्रगतीचा मार्ग दाखवणारे असल्याचे म्हणाल्या . यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनी आरती कांबळे हिने आपले समयोचित विचार व्यक्त केले…
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व विवेकानंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह अंतर्गत महाडच्या चवदार तळ्याचे शताब्दी वर्ष, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेले बहुमोल कार्य व महापुरुषांच्या विचारातून आजच्या युवकांचे योगदान या विषयावर विवेकानंद महाविद्यालय येथे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. जगन कराडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.कराडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून लोकांनी शिका, चेतवा व संघटित व्हा या…
कोल्हापूर, दि. 10 (जिमाका): बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 अन्वये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षामधील 25 टक्के कोट्यातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया राज्य शासनाच्या https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरील या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जिल्ह्यातील 315 शाळांमधील 3361 जागांसाठी एकूण 5328 ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. ज्या शाळांना 25% आरक्षित क्षमतेपेक्षा जादा अर्ज आलेले आहेत, अशा शाळांसाठी शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयाकडून राज्यस्तरावर 6 एप्रिल रोजी ऑनलाईन लॉटरी प्रक्रिया घेण्यात आलेली आहे. लॉटरीद्वारे पहिल्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी, तसेच पुढील प्रवेश फे-यांसाठी प्रतिक्षा यादी निश्चित करून RTE पोर्टलवरील होमपेजवर अपलोड करण्यात येत आहे. प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेचा…
भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी…