Author: admin

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 61.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे – हातकणंगले- 3.5 मिमी, शिरोळ -3.8 मिमी, पन्हाळा- 12.9 मिमी, शाहुवाडी- 13.1 मिमी, राधानगरी- 20.7 मिमी, गगनबावडा- 61.4 मिमी, करवीर- 9.4 मिमी, कागल- 10 मिमी, गडहिंग्लज- 10.4 मिमी, भुदरगड- 24.3 मिमी, आजरा- 18.1 मिमी, चंदगड- 36.1 मिमी असा एकूण 18.55 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 0000

Read More

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी 31 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस विभागाची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जाती धर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इत्यादी शांततामय मार्गाने साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, यात्रा, सण, प्रेतयात्रा आदींना लागू…

Read More

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.32 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, बाजार भोगाव, कांटे, करंजफेण व पेंडाखळे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे, कुंभी नदीवरील- सांगरुळ व कळे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव, कोडोली व खोची, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी व म्हसवे, धामणी नदीवरील- सुळे, हिरण्यकेशी नदीवरील- साळगांव, ऐनापूर व निलजी, तुळशी नदीवरील- बीड असे…

Read More

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवार, 31 जुलै रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन व कागलकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीरास कागल येथे उपस्थिती. (स्थळ: आर.के.मंगल कार्यालय, बामणी) दुपारी 1 ते 7 वाजता राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. शनिवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता कागल निवासस्थानी सर्व नागरिकांसाठी राखीव. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास, गडहिंग्लज येथे उपस्थिती. (स्थळ: गणेश मंगल कार्यालय, गांधीनगर, गडहिंग्लज) दुपारी 12 वाजता गडहिंग्लज नगरपरिषद वर्धापन दिनानिमित्त सफाई…

Read More

ड्रग्सच्या माध्यमातून भारताच्या तरुण पिढीला कमकुवत करण्याचे शत्रूंचे षडयंत्र – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा. प्रतिनिधी, मुंबई, ३० जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचे कौतुक करत, हे अभियान युवकांना जागरूक, सक्षम आणि नशामुक्त समाज घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले आहे. नशामुक्त भारताच्या संकल्पपूर्तीसाठी जनजागृती, कुटुंब, समाज आणि विविध संस्थांच्या सामूहिक सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. युवकांची ऊर्जा आणि सकारात्मक विचार हे विकसित भारताचे बळ असल्याचे नमूद करत त्यांनी या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या आशयाचे पत्र ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियान कार्यक्रमादरम्यान वाचून दाखविण्यात आले. वरळी येथील एनएससीआय डोम येथे…

Read More

पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमात इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वारकरी परंपरा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविले. इयत्ता १ ली व २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी, संत आणि पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. इयत्ता ३ री ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी हाऊसनिहाय लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. विविध लोकनृत्यांच्या प्रभावी सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकसंस्कृती, भक्तीपरंपरा आणि सांस्कृतिक वैभव यांचे उत्कृष्ट दर्शन घडविले. याचबरोबर पालक व आजी-आजोबांसाठी भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

Read More

कोल्हापूर, दि 25: मुंबई आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील आरोग्य सेवा , स्वच्छता,रुग्णाभिमुख सुविधा व सेवा वितरणाच्या गुणवत्तेची माहिती घेत रुग्णालयाचे कामकाज समाधानकारक असल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी आशा स्वयंसेविकांशी संवाद साधला. याप्रसंगी आशा स्वयंसेविकांनीआपल्या कामातील अनुभव,अडचणी, सूचना आयुक्तांसमोर मांडल्या. दरम्यान चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी शेंडा पार्क येथील जागेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर श्री.काटकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक घेण्यात आली.प्रारंभी उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी विभागातील आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांची सद्यस्थिती,उपलब्धी,आव्हाने…

Read More

कोल्हापुर दिनांक 24 – कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवठा झालेल्या सर्जिकल ग्लोव्हज प्रकरणातील संभाव्य गैरव्यवहार,आर्थिक अनियमितता,प्रशासकीय गैरकारभार व संबंधित बाबींची निःपक्षपाती ,सखोल व स्वतंत्र चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनच्या वतीने आरोग्य विभागाचे महाराष्ट्र राज्य आयुक्त संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सर्जिकल ग्लोव्हज पुरवठा करण्या ऐवजी साधे आणि सुमार नॉन सर्जिकल ग्लोव्हज पुरवून जिल्ह्यातील रुग्णांशी खेळ केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्या अनुषंगाने सर्व चौकशी करून दोषी अधिकारी,पुरवठादार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read More

कोल्हापूर दिनांक 24-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनच्या वतीने आर टी ई प्रवेश प्रक्रिया चौकशी प्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले.तसेच कोल्हापूर शहराच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.याबाबत सोमवार पासून कार्यवाही सुरू करू असा शब्द दिला आहे. कोल्हापूर शहरातील खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी आर टी ई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पार पडली आहे.या प्रकरणात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने शाळांमध्ये प्रवेश घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.त्यामुळे संघटनेने सर्व प्रवेश प्रक्रियेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.याबाबत पालकमंत्री…

Read More

कोल्हापूर दि:22 (जिमाका) राज्यातील जनतेला दिलासा देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू असून , आज या ठिकाणी भरविण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर त्याचाच एक भाग असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तर माजी उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून कसबा बावडा येथील महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचेआयोजन करण्यात आले होते याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . व्यासपीठावर महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड ,पोलीस अधीक्षक नीलोत्पल,मुद्रांक जिल्हाधिकारी…

Read More