कोल्हापुर दिनांक 24 – कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरवठा झालेल्या सर्जिकल ग्लोव्हज प्रकरणातील संभाव्य गैरव्यवहार,आर्थिक अनियमितता,प्रशासकीय गैरकारभार व संबंधित बाबींची निःपक्षपाती ,सखोल व स्वतंत्र चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनच्या वतीने आरोग्य विभागाचे महाराष्ट्र राज्य आयुक्त संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना सर्जिकल ग्लोव्हज पुरवठा करण्या ऐवजी साधे आणि सुमार नॉन सर्जिकल ग्लोव्हज पुरवून जिल्ह्यातील रुग्णांशी खेळ केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्या अनुषंगाने सर्व चौकशी करून दोषी अधिकारी,पुरवठादार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
