Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करण्यास यापूर्वी 17 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि या कालावधीत अल्प प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्याने या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना अर्ज सादर करण्यास 3 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली. 0000
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शनिवार, 20 जून रोजी सकाळी 9.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम व राखीव. दुपारी 4 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह. बँक लि. प्रशासकीय इमारत उद्घाटनास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध कार्यक्रमांना उपस्थिती. सायं. 7.30 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. रात्री 8.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथून विमानतळाकडे प्रयाण व रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण. 0000
कोल्हापूर, दि. 17 : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती योजनेंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या महिला सक्षमीकरण केंद्र (Hub for Women Empowerment), महिला हेल्पलाईन तसेच सखी-एक थांबा केंद्र, गडहिंग्लज येथे विविध संवर्गातील रिक्त पदे करार पद्धतीने भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी महिला व बाल विकास विभागाने http://www.wcdchrms.in हे वेब पोर्टल विकसित केले असून, 22 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. 11 ते 12 जुलै दरम्यान स्वयंचलित पध्दतीने गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. 13…
कोल्हापूर, दि. 17 : जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, आयुष विभाग राष्ट्रीय आयुष अभियान, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र – गोवा व माय भारत, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जुन रोजी सकाळी 7 ते 8.30 या वेळेत, महासैनिक दरबार हॉल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिधी, जिल्हा प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यलयातील अधिकारी कर्मचारी, राष्ट्रीय खेळाडू, नागरिकांनी 21 जून रोजी सकाळी 6.45 वाजता, महासैनिक दरबार हॉल येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे करण्यात…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 18 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 30 जून च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व…
मुंबई, दि. १८ : परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून त्याचा थेट सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर दिसून आला आहे. १ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत एसटी महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न ४९५,कोटी ३४ लाख रुपये इतके झाले असून, मागील वर्षीच्या याच कालावधीतील ४५१, कोटी ५१ लाख रुपयांच्या तुलनेत ४३ कोटी ८३ लाख रुपयांची (९.७१ टक्के)…
कोल्हापूर, दि. 16 (जिमाका): केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 19 व 20 जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये विमानतळ परिसर तसेच संपूर्ण कोल्हापूर व इचलकरंजी शहरात दिनांक 19 व 20 जून या कालावधीत ड्रोन कॅमेरे उडविणे आणि चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आली असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते कोल्हापूर विमानतळ, पोलीस परेड ग्राउंड व फुटबॉल मैदान, कसबा बावडा, महालक्ष्मी मंदिर, शासकीय विश्रामगृह, जनता सहकारी बँक,…
कोल्हापूर, दि. 16 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) ही महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था असून, राज्यात उद्योजकतेला चालना देणे, उद्योजकतेविषयी पोषक वातावरण निर्माण करणे तसेच उद्योजकीय ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करत असते. याच उद्देशाने एम.सी.ई.डी. जिल्हा कार्यालयामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिला तसेच नवउद्योजकांसाठी दोन आठवड्यांच्या ‘उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे’ आयोजन 22 जून ते 4 जुलै या कालावधीत कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, विविध उद्योग संधींची ओळख, उद्योग संधीचा शोध व निवड, उद्योग सुरू करण्याची पूर्वतयारी, उद्योग उभारणीचे विविध टप्पे, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ पाहणी तंत्र,…
कोल्हापूर, दि. १३ जून २०२६: पोदार प्रेप कोल्हापूर येथे बहुप्रतीक्षित “योग इन मड” या उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या अनोख्या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, कुटुंबीय आणि शिक्षक मोठ्या आनंदाने सहभागी झाले. मजा, शिक्षण आणि निसर्गाशी नाते जोडणारा हा अनुभव सर्वांसाठी संस्मरणीय ठरला. आंतरराष्ट्रीय मड डे निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये योग आणि संवेदनात्मक (Sensory) खेळ यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. पालक आणि मुलांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अनुभवाधारित शिक्षणाचा आनंद घेतला.या कार्यक्रमात मडी बडीज योग, मडी फीट योग, मातीने माखलेल्या हातांनी मुद्रा, मड पेंटिंग मास्टरपीस, मड बेकरी आणि मुक्त माती खेळ अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे…
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या अधिनस्त जिल्ह्यातील विविध मुलांचे व मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुलांचे शासकीय वसतिगृह पाचगाव, दसरा चौक, गडहिंग्लज, गारगोटी, हातकणंगले, कागल, चंदगड, शिरोळ, आजरा व राधानगरी येथे कार्यरत आहेत. तसेच मुलींचे शासकीय वसतिगृह साईनाथ कॉलनी, कसबा बावडा, गारगोटी, हातकणंगले, गडहिंग्लज, आजरा व इचलकरंजी येथे सुरू आहेत. या वसतिगृहांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. शालेय विद्यार्थी तसेच इयत्ता 10 वी व 11 वी नंतरच्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या…