
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शनिवार, 20 जून रोजी सकाळी 9.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम व राखीव. दुपारी 4 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह. बँक लि. प्रशासकीय इमारत उद्घाटनास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध कार्यक्रमांना उपस्थिती. सायं. 7.30 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. रात्री 8.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथून विमानतळाकडे प्रयाण व रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.
0000