Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय, निमशासकीय विषयांकीत कामांच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळण्यासाठी स्वत: उपस्थित राहून अर्ज सादर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी केले आहे. तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार, जिल्हाधिकारी/ महानगरपालिका स्तर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार, विभागीय आयुक्त स्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार व मंत्रालय स्तरावर प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो. अर्ज स्वीकृतीचे निकष याप्रमाणे- अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्रपत्र…
कोल्हापूर दिनांक – 31 कोल्हापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ए.एस.ट्रेडर्स शेअर मार्केट गुंतवणूक दार फसवणूक प्रकरणातील अटकेत असणाऱ्या अमित शिंदे याची आलिशान मर्सिडीज बेंझ पुण्यातून ताब्यात घेण्यात आली आहे.कोल्हापूर पोलिसांनी सदरची कारवाई केली. कंपनीच्या संचालक यांनी गुंतवणूकदार यांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्याने याबाबत बऱ्याच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये यापूर्वीच अटकेत असणारा अमित शिंदे याची पत्नी सौ आर्या यांच्या नावावर असणारी आलिशान मर्सिडीज बेंझ ही कार कोथरूड पुणे येथे ऑटोमेशन शोरुम ला आली असल्याची गोपनीय माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी त्या शोरुम मधून सदरच्या गुन्ह्यात ब्लॅकलिस्ट कार जप्त करून ताब्यात घेतली आहे. सदर कारवाईत पोलिस अंमलदार…
कोल्हापूर दि.29(जिमाका): जोतिबा चैत्र यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात असून येणाऱ्या भाविकांना गैरसोय होणार नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने यात्रेवेळी प्लास्टीक बंदी असून भाविकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा. पर्यावरण पूरक, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात यात्रा पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. जोतिबा डोंगरावरील एमटीडीसी सभागृहात आयोजित श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथील श्री जोर्तिंलिंग देव यात्रेच्या पूर्व तयारी नियोजन बैठकीत ते बोलत होते. जोतिबा चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधा व सुरक्षेसाठी पश्चिम देवस्थान समिती, जिल्हा परिषद, पोलीस व वाहतुक प्रशासन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य परिवहन विभाग, अन्न व औषध विभाग, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक,…
कोल्हापूर दिनांक 28 – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या प्रोटोकॉल नुसार वापरात येणारी सुमार दर्जाची गाडी पाहून रोखठोक स्वभावाचे दादांनी प्रशासनाला चांगलं सुनावत व पाच नवीन गाड्यांचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याविषयी जिल्हा प्रशासनाला सुचित केले…स्वतःच्या व्यक्तिगत कामकाजा बरोबर सामाजिक कामाविषयी पण नेहमीच सतर्क असणाऱ्या दादांना स्वतःच्या गाडीच्या सुविधांच्याबद्दल सावधगिरी बाळगत असताना आज हीच कोल्हापूरची जनता कुठल्या त्रासात व कुठल्या प्रश्नात अडकलेली आहे याचा शोध आणि बोध घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झालेली नाही काय ? असा सवाल शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे…
पुरुष गटात कोल्हापूरचा संघ प्रथम, महिला गटात धाराशिव संघ प्रथम विजेता किशोर गटात कोल्हापूर संघ प्रथम, किशोरी गटात सांगलीचा संघ प्रथम विजेता कोल्हापूर, दि.27 (जिमाका): इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडासंकुल असणे आवश्यक आहे. खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी इचलकरंजीला क्रीडासंकुल निश्चितपणे मंजूर करुन देईन, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजी वासियांना दिला. इचलकरंजी येथील विठ्ठल रामजी शिंदे प्रशाला येथे कल्लाप्पा आवाडे क्रीडानगरीत आयोजित केलेल्या कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2024-25 बक्षीस वितरण व निरोप सभारंप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार राहूल आवाडे, आमदार…
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : चैत्रशुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा पवित्र समजला जातो. या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करावा. या उद्देशाने ‘गुढी पाडवा शाळा प्रवेश वाढवा’ हा उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबविला जातो. या अनुषंगाने गुढी पाडव्यादिवशी आपल्या दाखलपात्र (6 वर्षे पूर्ण असणाऱ्या) बालकाचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करुन आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा शुभारंभ करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे. …
मुंबई, दिनांक २६: महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसिद्धा उपक्रमाद्वारे सातत्यपूर्णरित्या प्रयत्नशील अशी व्रतस्थ समाजसेविका हरपली, अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, ‘स्वयंसिद्धा’च्या संस्थापक संचालिका कांचनताई परुळेकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात “कांचनताईंनी ग्रामीण महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महिलांना त्यांनी स्वयंसिद्धा च्या माध्यमातून विविध शिक्षण – प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. यातून अनेक महिलांना उद्योजकतेची प्रेरणा मिळाली. यातून अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले. कांचनताईंच्या निधनाने महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्याच्या क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून, मुख्यमंत्री…
* प्लास्टिक मुक्त यात्रा साजरी करुन पर्यावरणाचे रक्षण करुया * भाविकांनी प्लॅस्टिकच्या पिशवी ऐवजी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा कोल्हापूर दि.25 (जिमाका): श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे होणारी चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त होण्यासाठी भाविक, व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लॅस्टीक वापरावर बंदी घालण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पन्हाळा, शाहूवाडी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान…
कोल्हापूर दिनांक 24 – कोल्हापूर मधील जुना बुधवार पेठेच्या तालमीलगत असणाऱ्या संजय फरसाण केंद्र चे तरुण उद्योजक प्रतीक पाटील यांचा आज वाढदिवस.वडील संजय पाटील यांच्या 40 वर्षे प्रवासाची भागदौड यशस्वीपणे सांभाळणारा मृदुभाषिक मनमिळावू संयमी व्यक्तिमत्व लाभलेल्या या तरुणाने अल्पावधीतच आपल्या कष्टाची चुणूक दाखवली आहे. सर्व सुख सुविधा पायाशी लोळण घेत असताना श्रीमंतांची कित्येक मुले व्यसनाधीन आणि वाम मार्गाला लागल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळते.परंतु संजय पाटील यांचे एकुलते एक सुपुत्र प्रतीक पाटील यांनी वडिलांच्या हातावर हात ठेवून व्यवसायासाठी कष्टाची निवड केली.संजय फरसाण संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला ब्रँड असताना त्याची भागदौड प्रतीक ने यशस्वीरित्या सांभाळून दाखवत वडिलांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.आजही प्रतीक…
शिव आरोग्य सेना आयोजित डॉ संतोष पाटील यांच्या पूजा क्लिनिक व जानकी हॉस्पिटल यांच्या मार्फत वतीने आज कनेरकर नगर येथे मोफत भव्य आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिरा अंतर्गत मोफत ई सी जी, रक्तातील शुगर, ब्लड प्रेशर ची तपासणी करण्यात आली तसेच ह्यावेळी ४०० पेक्षा जास्त लोकांनी ह्याचा लाभ घेतला व कोल्हापुरातील आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या व वेळोवेळो गरीब लोकांना सहकार्य करण्याऱ्या डॉ शिरीष मिरगुंडे, डॉ गीता पिल्लाई, डॉ सारंग खोचीकर, डॉ प्रशांत चौधरी, डॉ जयंत भोसले, डॉ विकास कागले, डॉ अजित सर, कोरोना काळातील कर्तव्या साठी हर्षल सुर्वे, आरोग्य मित्र बंटी सावंत, सुधीर बुवा यांच्या ११ जणांचे…