कोल्हापूर दिनांक 24 – कोल्हापूर मधील जुना बुधवार पेठेच्या तालमीलगत असणाऱ्या संजय फरसाण केंद्र चे तरुण उद्योजक प्रतीक पाटील यांचा आज वाढदिवस.वडील संजय पाटील यांच्या 40 वर्षे प्रवासाची भागदौड यशस्वीपणे सांभाळणारा मृदुभाषिक मनमिळावू संयमी व्यक्तिमत्व लाभलेल्या या तरुणाने अल्पावधीतच आपल्या कष्टाची चुणूक दाखवली आहे.
सर्व सुख सुविधा पायाशी लोळण घेत असताना श्रीमंतांची कित्येक मुले व्यसनाधीन आणि वाम मार्गाला लागल्याचे चित्र आपल्याला पहायला मिळते.परंतु संजय पाटील यांचे एकुलते एक सुपुत्र प्रतीक पाटील यांनी वडिलांच्या हातावर हात ठेवून व्यवसायासाठी कष्टाची निवड केली.संजय फरसाण संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला ब्रँड असताना त्याची भागदौड प्रतीक ने यशस्वीरित्या सांभाळून दाखवत वडिलांचा विश्वास सार्थ ठरविला आहे.आजही प्रतीक कोणत्याही कामाला लाजत नाही अगदी दुचाकी वरून पिठाचे पोते असो वा टेम्पो चालवून तेलाचे बॅरल असो हा पठ्ठ्या तुम्हाला दिसणारच.त्यामुळे प्रतीक ने कोणताही बडेजावपना न ठेवता आपला व्यवसायच आपले दैवत मानून काम सुरू ठेवले आहे.त्याच्या वयापेक्षा जास्त वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रतीक अगदी मुलांसारखा वाटतो.त्यामुळे त्याचे सर्वांशी जमते.कोणतेही सामाजिक कार्य असो अथवा स्पोर्ट्स असो प्रतीक चा सहभाग असतोच.त्यामुळे प्रतीकचा मित्रपरिवार सुद्धा मोठा आहे.तसेच सर्व ग्राहक व
जुना बुधवार पेठेतील सर्व थोरा मोठ्यांना सन्मानाने वागणूक देऊन त्याने आपली योग्यता सिद्ध केली आहे.
वडिलांकडून व्यवसायातील बारकावे शिकत शिकत प्रतीकने यात प्राविण्य मिळविले.तसेच दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी अखंडपणे जिलेबी स्टॉल सुद्धा न चुकता प्रतीक चालवत आहे.यासाठी त्याचे आई सौ वंदना यांनी केलेले संगोपन सुद्धा महत्वाचे आहे आणि आता पत्नी सौ. तन्वी सुद्धा त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याला व्यवसायात साथ देत आहे.
त्यामुळे कठोर संघर्षातून उभा राहिलेले प्रसिद्ध उद्योजक संजय पाटील यांची दुसरी पिढी प्रभावीपणे डोलारा सांभाळताना दिसत आहे.त्यानिमित प्रतीक ला विविध स्तरातून वाढदिवसाच्या शुभेच्छाचां वर्षाव होत आहे.
