कोल्हापूर दिनांक – 31 कोल्हापूर सह संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या ए.एस.ट्रेडर्स शेअर मार्केट गुंतवणूक दार फसवणूक प्रकरणातील अटकेत असणाऱ्या अमित शिंदे याची आलिशान मर्सिडीज बेंझ पुण्यातून ताब्यात घेण्यात आली आहे.कोल्हापूर पोलिसांनी सदरची कारवाई केली.
कंपनीच्या संचालक यांनी गुंतवणूकदार यांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केली असल्याने याबाबत बऱ्याच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये यापूर्वीच अटकेत असणारा अमित शिंदे याची पत्नी सौ आर्या यांच्या नावावर असणारी आलिशान मर्सिडीज बेंझ ही कार कोथरूड पुणे येथे ऑटोमेशन शोरुम ला आली असल्याची गोपनीय माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी त्या शोरुम मधून सदरच्या गुन्ह्यात ब्लॅकलिस्ट कार जप्त करून ताब्यात घेतली आहे. सदर कारवाईत पोलिस अंमलदार विजय काळे,राजू येडगे,राजेंद्र वरांडेकर यांनी सहभाग घेतला. त्यामुळे एक मोठी कामगिरी झाली असल्याचे बोलले जात आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
