Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : पोस्टल पेन्शनधारकांच्या तसेच कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन, पणजी यांच्यावतीने सोमवार, 20 जुलै रोजी दुपारी 3 वाजता पोस्टमास्तर जनरल कार्यालय, गोवा रिजन, पणजी-403001 येथे पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. या अदालतीचा लाभ गोवा राज्यासह सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र निवृत्तिवेतनधारकांना मिळणार आहे. टपाल विभागातून निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनधारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारींचा या अदालतीत विचार करण्यात येणार आहे. टपाल विभागाचे निवृत्तीवेतनधारक ज्यांचे तीन महिन्याच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्यांसह प्रकरणे…
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे प्रवेशसत्र ऑगस्ट 2026 साठी विविध अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायांमध्ये एकूण 1 हजार 316 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. संस्थेत दोन वर्ष मुदतीच्या अभियांत्रिकी व्यवसायांसाठी 772 जागा उपलब्ध असून त्यामध्ये आरेखक स्थापत्य, आरेखक यांत्रिकी, इन्फमेश कम्युनिकेशन टेक्नॉ. सिस्टीम मेन्टनन्स, यंत्रकारागीर, यंत्रकारागीर घर्षक, मेक मशिन टूल्स मेन्टनन्स, कातारी, वीजतंत्री, जोडारी, यांत्रिकी प्रशितन व वातानुकुलीत टेक्नीशियन, रंगारी सर्वसाधारण, टूल ॲन्ड डायमेकर, तारतंत्री, यांत्रिकी मोटारगाडी, यांत्रिकी कृषी व यंत्रसामुग्री, वीज विलेपक इ. तसेच एक वर्ष मुदतीच्या अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी व्यवसायांसाठी 544 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये यांत्रिकी…
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करण्यास यापूर्वी 17 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि या कालावधीत अल्प प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्याने या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहायता बचत गटांना अर्ज सादर करण्यास 3 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली. 0000
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शनिवार, 20 जून रोजी सकाळी 9.15 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम व राखीव. दुपारी 4 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सह. बँक लि. प्रशासकीय इमारत उद्घाटनास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध कार्यक्रमांना उपस्थिती. सायं. 7.30 वाजता कोल्हापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. रात्री 8.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथून विमानतळाकडे प्रयाण व रात्री 8.50 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण. 0000
कोल्हापूर, दि. 17 : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती योजनेंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या महिला सक्षमीकरण केंद्र (Hub for Women Empowerment), महिला हेल्पलाईन तसेच सखी-एक थांबा केंद्र, गडहिंग्लज येथे विविध संवर्गातील रिक्त पदे करार पद्धतीने भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी महिला व बाल विकास विभागाने http://www.wcdchrms.in हे वेब पोर्टल विकसित केले असून, 22 जून रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. 11 ते 12 जुलै दरम्यान स्वयंचलित पध्दतीने गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. 13…
कोल्हापूर, दि. 17 : जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, आयुष विभाग राष्ट्रीय आयुष अभियान, केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय महाराष्ट्र – गोवा व माय भारत, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जुन रोजी सकाळी 7 ते 8.30 या वेळेत, महासैनिक दरबार हॉल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिधी, जिल्हा प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यलयातील अधिकारी कर्मचारी, राष्ट्रीय खेळाडू, नागरिकांनी 21 जून रोजी सकाळी 6.45 वाजता, महासैनिक दरबार हॉल येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे करण्यात…
कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी संपूर्ण जिल्ह्यात 18 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 30 जून च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजावण्यासंदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व…
मुंबई, दि. १८ : परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती प्रियांका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले असून त्याचा थेट सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर दिसून आला आहे. १ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत एसटी महामंडळाचे एकूण वाहतूक उत्पन्न ४९५,कोटी ३४ लाख रुपये इतके झाले असून, मागील वर्षीच्या याच कालावधीतील ४५१, कोटी ५१ लाख रुपयांच्या तुलनेत ४३ कोटी ८३ लाख रुपयांची (९.७१ टक्के)…
कोल्हापूर, दि. 16 (जिमाका): केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या 19 व 20 जून रोजी होणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये विमानतळ परिसर तसेच संपूर्ण कोल्हापूर व इचलकरंजी शहरात दिनांक 19 व 20 जून या कालावधीत ड्रोन कॅमेरे उडविणे आणि चित्रीकरण करण्यास प्रतिबंध करण्यात आली असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ते कोल्हापूर विमानतळ, पोलीस परेड ग्राउंड व फुटबॉल मैदान, कसबा बावडा, महालक्ष्मी मंदिर, शासकीय विश्रामगृह, जनता सहकारी बँक,…
कोल्हापूर, दि. 16 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) ही महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था असून, राज्यात उद्योजकतेला चालना देणे, उद्योजकतेविषयी पोषक वातावरण निर्माण करणे तसेच उद्योजकीय ज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करत असते. याच उद्देशाने एम.सी.ई.डी. जिल्हा कार्यालयामार्फत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महिला तसेच नवउद्योजकांसाठी दोन आठवड्यांच्या ‘उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे’ आयोजन 22 जून ते 4 जुलै या कालावधीत कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्त्व विकास, विविध उद्योग संधींची ओळख, उद्योग संधीचा शोध व निवड, उद्योग सुरू करण्याची पूर्वतयारी, उद्योग उभारणीचे विविध टप्पे, सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ पाहणी तंत्र,…