कोल्हापूर दिनांक 24 – कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सांगरूळ मतदार संघातून काँग्रेसच्या सौ. शितल संदीप यादव यांची उमेदवारी लक्षवेधी ठरणार का? यावर चर्चेला उधाण आले असून या मतदार संघात त्या “सांगरूळ” च्या प्रबळ विजयी दावेदार समजल्या जात आहेत.
उमेदवार शितल यादव यांचे पती स्वामी समर्थ टाईल्स (बलिंगा) चे संदीप यादव यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेसचे नेते बंटी पाटील यांनी या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.संदीप यादव यांनी आजपर्यंत गरीब,गरजू,अनाथ असलेलेल्या विद्यार्थांसाठी निवासी शाळा असलेल्या उमेद फाऊंडेशनच्या माध्यमातुन त्यांनी शैक्षणिक साहित्य व पोषण आहार तसेच उमेद मायेचे घर म्हणजेच निवासस्थानला लागणारे टाईल्स मटेरीयलची मदत,गावातील व भागातील बऱ्याच मंदिरांसाठी लागणारी टाईल्स त्यांनी मदत स्वरूपात दिली आहे.
तसेच त्यांनी सामान्य लोकांसाठी आधार म्हणून दवाखाना, पोलिस स्टेशन,प्रशासकीय कार्यालये येथे येणाऱ्या अडचणींसाठी पुढाकार घेऊन,त्यांची अडचण दुर करत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. अशा बऱ्याच वेगवेगळ्या विभागात मदतीचा हात दिला आहे.त्यांना सामाजिक शैक्षणिक तसेच वैद्यकीय विभागामध्ये लोकांसाठी काम करण्याची आवड आहे.
या मतदार संघातून प्रतिनिधित्व मिळाल्यास पुरुष व महिलांसाठी रोजगार निर्मिती ,शासकीय योजना लोकांन पर्यंत पोहोचवून त्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.तसेच रस्ते, गटर्स, लाईट, पाणी याची रिपेअरी व नूतनीकरण,क्रीडा उपक्रम, तसेच शासनाचा भरीव निधी उपलब्ध करून मतदारसंघातील गावांचा विकास करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.संदीप यादव यांचा मतदारसंघात असणारा उत्कृष्ट जनसंपर्क आणि नेते आम. बंटी पाटील, आम. जयंत आसगांवकर यांचे पाठबळ असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
