
कोल्हापूर, दि. 13 (जिमाका): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग/संस्था/महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी निःशुल्क अनिवासी अमृत-बेकरी प्रशिक्षण 18 डिसेंबर ते 17 जानेवारी 20 या कालावधीत कॉन्टिनेन्टल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, प्लॉट नं. 136 ई वार्ड, शास्त्री नगर रोड, वाय.पी.पोवार नगर कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
खुल्या प्रवर्गातील जाती-ब्राह्मण,बनिया,कम्मा, राजपुरोहीत,कायस्थ,ऐयांगर,नायर,नायडू,त्यागी, पाटीदार,बंगाली,पटेल,येलगार,मारवाडी,ठाकूर, सेनगुंथर,गुजराथी,जाट,सिंधी, कानबी,राजपूत, कोमटी या प्रवर्गासाठी असून प्रवेश मर्यादा 40 असणार आहे.
तांत्रिक प्रशिक्षण 24 दिवस-बेकरी उत्पादनांची व्याप्ती आणि महत्व,बेकरीमध्ये विविध व्यवसाय संधी :- बेकरी उत्पादनांच्या उत्पादनासाठी विविध तंत्र,विविध बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी विशेष उपकरणे आणि साधने याबाबत माहिती, केक,टी टाइम केक,कुकीज आणि पफ पेस्ट्रीजचे प्रकार,ब्रेड,टोस्ट,पाव,पिझ्झा – बर्गर-बन तसेच चॉकलेटचे विविध प्रकार तयार करणे, थेअरी व प्रात्यक्षिक,तयार मालाची गुणवत्ता – मापदंड,अन्न सुरक्षा आणि वैयक्तिक स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षा पध्दती आदी .
FSSAI परवाना आणि Udyam नोंदणीसाठी अर्ज कसा करावा :-उद्योजकता विकास प्रशिक्षण 6 दिवस ,उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजकाशी संवाद,सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट, बाजारपेठ पाहणी आणि तंत्रे,उद्योगाची उभारणी, उद्योगाचे व्यवस्थापन,शासकिय कर्ज आणि अनुदान, बँकेची भूमिका-योजना,अभिप्रेरणा प्रशिक्षण (AMT), PPR आणि DPR तयार करणे,उद्योगांना भेटी
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :-
शैक्षणिक पात्रता: किमान 8 वी पास,पदवी व तांत्रिक शिक्षण यांना प्राधान्य,जातीचा उल्लेख असलेला कोणताही शासकीय कागदपत्रांचा पुरावा,अंतिम शिक्षणाची मार्कलिस्ट,शाळा सोडल्याचा दाखला,महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याचे (Domicile Certificate) तहसीलदाराचे प्रमाणपत्र,आधार-पॅन कार्ड,21 से 50 वर्ष वयोमर्याद,कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असल्याचा उत्पन्नाचा दाखला, विवाहित महिला असल्यासः गॅझेट/विवाह प्रमाणपत्र/पॅनकार्डची प्रत,प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांच्या अर्जांना प्राधान्य देऊन निवड करण्यात येईल. प्रवेश अर्ज व सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित एमसीडी जिल्हा कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी वनिता पाटील,प्रकल्प अधिकारी – 9422810863/9730560570 ,प्रविण कायदे
प्रकल्प अधिकारी,एमसीईडी उद्योग भवन 9403078774/9922963096,प्रशांत जोशी,
जिल्हा व्यवस्थापक,अमृत कोल्हापूर – 9112228764 अलोक मिश्रा, विभागीय अधिकारी एमसीईडी पुणे तसेच कार्यालय- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,315 ई वॉर्ड, दत्ताजी चेंबर्स, हॉटेल मराठा रिजन्सीजवळ बाबा मोटर्स वस्ती, कोल्हापूर येथे इच्छूकांनी संपर्क साधावा.
0000