Author: admin

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह करणा-या जोडप्यांना सुरक्षा देण्याकरीता सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना प्रत्येक जिल्ह्यात विशेष (Special Cell), सुरक्षागृहे स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, दंडात्मक उपाययोजना सूचविल्या आहेत. विविध घटकांच्या जबाबदा-यांमध्ये स्पष्टता यावी यासाठी शासनाकडून मानक कार्यप्रणाली (SOP) जाहीर झाली असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.एस. वाईंगडे यांनी दिली. विशेष कक्ष (Special Cell) स्थापन करणे – शासन परिपत्रकान्यवे पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष (Special Cell) स्थापन करण्यात आले आहेत. या विशेष कक्षात जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे सदस्य तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे सदस्य सचिव…

Read More

कोल्हापूर दि : 28 (जिमाका) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन कालखंडात मराठा योध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाने शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्र प्रदर्शनाचे भोसले घरण्याशी संबंधित सातारा, नागपूर व कोल्हापूर या शहरांमध्ये प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन केवळ राज्य शासनाचा उपक्रम न राहता तो लोकोत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले . राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथे आज शिवशस्त्रशौर्यगाथा या उपक्रमांतर्गत लंडन येथून आणलेल्या वाघनखे व मराठाकालीन शस्त्र प्रदर्शनाचे श्री. शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी…

Read More

कोल्हापूर – निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांची निवडसुची 2025-26 मध्ये उपजिल्हाधिकारी(निवडश्रेणी) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती व पदस्थापना देण्यात आली आहे.त्यानुसार संजय तेली यांची वर्धा येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.त्याबाबतचे शासन आदेश उपसचिव महेश वरुडकर यांनी जारी केला आहे.संजय तेली यांनी कोल्हापूर मध्ये पुनर्वसन व निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्य केलेले आहे.

Read More

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यातील एकूण 7 हजार 495 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खात्यावर भाऊबीज रक्कम प्रति 2 हजार प्रमाणे रक्कम रु. 1 कोटी 49 लाख 90 हजार जमा करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बँक खती रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुजितकुमार इंगवले यांनी केले आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालविकासाच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असून त्यांचा सन्मान म्हणून शासनाच्यावतीने भाऊबीज भेट स्वरुपात आर्थिक लाभ देण्यात आला आहे. सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम थेट (Direct Benefit Transfer पद्धतीने)…

Read More

कोल्हापूर, दि. ११* : आज सकाळी ६:३० वाजता कोल्हापूरच्या पोलीस परेड मैदानावर रन अँड वॉक च्या माध्यमातून उत्साहाचा धबधबा अवतरला. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ‘नशामुक्त कोल्हापूर’ या रन-वॉक रॅलीत ६ ते ६० वयोगटातील तब्बल ५ हजारांहून अधिक बालक, महाविद्यालयीन विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. या रॅलीला जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी हिरवा झेंडा दाखवत शुभारंभ केला. या रॅलीचा मार्ग पोलीस परेड ग्राऊंड (कसबा बावडा) येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि पुन्हा परत पोलीस परेड ग्राऊंड असा होता. ही दौड सर्व वयोगटांसाठी खुली आणि मोफत होती. आरोग्य, फिटनेस…

Read More

कोल्हापूर, दि. १० (जिमाका) : पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आज १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘ग्रीन डे’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी स्वतः सायकलचा वापर करुन कार्यालयात येत उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. या अभिनव उपक्रमाद्वारे कोल्हापूर जिल्ह्याने देशभरात पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श निर्माण केला असून, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता न राहता वर्षभर आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. सर्व…

Read More

कोल्हापूर, दि. ४ : मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी कोल्हापुरातील सामाजिक संस्था आणि नागरिकांनी पुढाकार घेत सढळ हाताने मदत केली आहे. नृसिंह सरस्वती देवस्थान, नृसिंह वाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. हा धनादेश संस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी आणि सहकारी संस्था सदस्य यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी जिल्हा कक्षाचे प्रमुख डॉ. चंद्रकांत परुळेकर आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांना सुपूर्द केला. याशिवाय, ज्येष्ठ नागरिक संघ, हुपरी यांच्याकडून १५ हजार रुपयांचा धनादेशही या निधीसाठी प्राप्त झाला. आतापर्यंत एकूण ५ लाख १७ हजार १११ रुपयांचा मदतनिधी पूरग्रस्तांसाठी जमा झाला आहे,…

Read More

कोल्हापूर, दि.०४ : महाराष्ट्रात एक ऐतिहासिक पाऊल उचलत कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी समुदायाच्या मैत्री संघटनेला रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला आहे. तृतीयपंथी समुदायाला भेदभाव, गरिबी, सामाजिक बहिष्करण आणि रोजगाराच्या संधी मिळण्यातील अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर, त्यांना रोजगाराचे साधन आणि मूलभूत हक्क मिळावेत, यासाठी मैत्री संघटनेने राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी नवीन रास्त भाव धान्य दुकान प्रक्रिया राबवली. त्यानुसार, कोल्हापूर शहरात मैत्री संघटनेची निवड करून त्यांना नवीन दुकानाचा परवाना देण्यात आला. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असून, यामुळे तृतीयपंथी समुदायासाठी एक आदर्श…

Read More

कोल्हापूर, दि. ४ ऑक्टोबर २०२५ – पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. शाळेतील नर्सरी ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून गरबा आणि ढोल ताशाच्या तालावर नृत्य सादर केले. विविध गायन स्पर्धा,नृत्य स्पर्धा,रांगोळी, नृत्य आणि देवींच्या स्वरूपातील सादरीकरण विद्यार्थ्यांनी रंगतदार पद्धतीने सादर केल्या. शाळेच्या परिसरात देवीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मुख्याध्यापिका शिल्पा कपूर,उपमुख्याध्यापिका मनीषा अंब्राळे व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे आणि परंपरेचे महत्व समजून घेण्यास मदत झाली.

Read More

नृसिंहवाडी ता.शिरोळ येथील दत्तमंदिर परिसरातील छत्रपती शाहू महाराजांनी सुरू केलेल्या धार्मिक परंपरा पुन्हा सुरू करण्याची मागणी तीव्र झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सनई-चौघडा, नगारा आणि इतर पारंपरिक कार्यक्रम बंद केल्याच्या निषेधार्थ ‘छत्रपती राजे प्रेमीं’ आणि सामाजिक कार्यकर्ते मोरया ग्रुप पुणे चे अध्यक्ष योगेश घुले व सकल मराठा क्रांती मोर्चाचे नेते सागर धनवडे यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद आहे की, शाहू महाराजांनी दत्तमंदिरातील आरती व पूजेच्या वेळी सनई-चौघडा आणि नगारा सुरू करण्याची परंपरा रुजवली होती. समता, श्रद्धा आणि लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या प्रथा सि. स. नं. ४६९ येथील त्यांच्या धर्मशाळा आणि नगारखान्यातून चालवल्या जात. ही जागा…

Read More