Author: admin

कोल्हापूर दि :27 (जिमाका) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) अधिनियमांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पोलिसांनी साठ दिवसांच्या आत तपास करून संबंधितावर मुदतपूर्व दोषारोप पत्र दाखल करावे असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले . जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते .यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले , पोलीस विभागाकडे जी प्रलंबित प्रकरणी दाखल आहेत या प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून सर्व प्रकरणे मार्गी लावावीत तसेच यावेळी त्यांनी 15 पिडीतांच्या अर्थसाह्य प्रकरणांना मंजुरी दिली. प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्तांत…

Read More

मुंबई : (२७ फेब्रुवारी) राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून कायदेशीर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसत आहे. परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढत असून प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा अवैध प्रवासी वाहतूकीवर निर्बंध आणावेत त्यासाठी १ मार्चपासून राज्यभर प्रभावी मोहीम राबवावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला (RTO) दिले. ते या अनुषंगाने विधानभवनात बोलावलेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, व संबंधित अधिकारी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, वाहनांची नियमित तपासणी न करणे…

Read More

कोल्हापूर, दिनांक ___ फेब्रुवारी 2026 न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून वकील हा न्यायदान प्रक्रियेतील केंद्रबिंदू आहे. न्यायव्यवस्था सक्षम व सशक्त राहण्यासाठी विद्वान, अभ्यासू व तत्त्वनिष्ठ वकिलांची फळी तयार होणे अत्यावश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत नव्याने विधी पदवी प्राप्त केलेल्या तरुण वकिलांना आर्थिक सुरक्षिततेचा अभाव असल्याने अनेक जण कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्युनिअर वकिलांना सुरुवातीच्या कालावधीत शिकाऊ शिष्यवृत्ती (Stipend) मिळावी, ही मागणी सातत्याने करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांच्या पुढाकाराने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या सहा जिल्ह्यांच्या वतीने सन 2024-25 मध्ये या मागणीसाठी व्यापक चळवळ उभारण्यात आली. दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी…

Read More

विशेष लेख क्रमांक 13 20 फेब्रुवारी 2026 *गुरु तेग बहादुर : भारताच्या धर्मस्वातंत्र्य परंपरेचे प्रतीक* भारताच्या इतिहासात धर्मस्वातंत्र्य, मानवी मूल्ये आणि सर्वधर्मसमभाव यांसाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे बलिदान अग्रक्रमाने स्मरणात राहते. त्यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा आणि संदेशाचा स्मरणोत्सव देशभर साजरा करण्यात येत आहे. सन १६७५ च्या सुमारास तत्कालीन परिस्थितीत काही भागांमध्ये धार्मिक तणाव निर्माण झाला होता. अशा वेळी पीडित घटकांनी संरक्षण व मार्गदर्शनासाठी गुरु तेग बहादुर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित न राहता, प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे, हा मूलभूत संदेश दिला. धर्मस्वातंत्र्याचे रक्षण हीच खरी मानवसेवा आहे, या भूमिकेतून…

Read More

   कोल्हापूर, दि. १९ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ नामांकनामुळे जागतिक नकाशावर झळकलेल्या किल्ले पन्हाळगडावर आज शिवजयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मेगा पदयात्रा’ (My Bharat – Mera Yuva Bharat) आणि रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला  शिवप्रतिमेचे पूजन आणि पाळणा सोहळा सकाळी आमदार विनय कोरे, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले. महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर पारंपरिक पाळणा सोहळा पार पडला. यावेळी…

Read More

कोल्हापूर, दि. 19 (जिमाका) :- जिल्यातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज आणि हातकणंगले तालुक्यातील गरजू व वयोवृद्ध रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. हे आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत एक हजार रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले. ते म्हणाले या अभियानात तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विविध आजारांवरील शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. आजारपणामुळे आर्थिक व मानसिक ताण सहन करणाऱ्या कुटुंबांना दिलासा देणे हा या अभियानामागील मुख्य उद्देश असून…

Read More

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आयोजित विशेष सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश न्या. एम. एस. जावळकर (नागपूर खंडपीठ) यांनी विद्यार्थ्यांना संविधान विषयक मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई यांच्या पुढाकारातून आयोजित संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या राज्यव्यापी उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. संविधानाबद्दल सखोल ज्ञान, लोकशाही मूल्यांची जाणीव आणि सामाजिक न्यायाची बांधिलकी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मराठी,…

Read More

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषद/नगरपंचायत व तालुक्याच्या हद्दीतील आपले सरकार सेवा केंद्रांसाठी गावनिहाय 1400 रिक्त ठिकाणांचा जाहिरनामा दि. 31 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. शासन निर्णयानुसार लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे देय असलेली केंद्रांची संख्या यापूर्वीच पूर्ण झाल्यामुळे मौजे खेबवडे (ता. करवीर) येथील 1 व मौजे देवठाणे (ता. पन्हाळा) येथील 1 असे एकूण 2 केंद्रे जाहिरनाम्यातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता एकूण 1398 ठिकाणांसाठी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जाहिरनाम्यानुसार 1398 केंद्रांसाठी एकूण 3615 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 35 अर्ज अपात्र ठरले असून 38 अर्ज दुबार आढळले आहेत. अशा एकूण 73 अर्जदारांची संख्या अपात्र व दुबार यादीत…

Read More

कोल्हापूर, दि. १७ (जिमाका) : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी ९ ऑगस्ट २०१९ पासून सुरू असून पात्र अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नामदेव परीट यांनी केले आहे. या ऐच्छिक व अंशदायी पेन्शन योजनेअंतर्गत १८ ते ४० वर्षे वयोगटातील आणि भू-अभिलेखांनुसार २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले शेतकरी पात्र आहेत. लाभार्थ्यांनी वयानुसार दरमहा रुपये ५५ ते २०० पर्यंतचा हप्ता वयाच्या ६० वर्षांपर्यंत भरायचा असून केंद्र शासनाकडून तितकीच रक्कम पेन्शन फंडात जमा केली जाणार आहे. ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यास दरमहा रुपये ३ हजार निश्चित पेन्शन मिळणार आहे. नोंदणीसाठी…

Read More

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शाहू सभागृह येथे जिल्हा पुनर्वसन समिती, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती व चाईल्ड हेल्प लाईन यांची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 बाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. कोल्हापूर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांनी बालविवाह रोखण्यासाठी सविस्तर कार्यपद्धती (SOP) तयार करावी. ही माहिती गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांना देऊन प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच बालविवाहाच्या घटनेत संबंधित अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास त्यांच्यावर…

Read More