Author: admin

कोल्हापूर, दि. 01 (जिमाका) : कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू असून यामध्ये इयत्ता 7 वी च्या पुढे विद्यालयीन, महाविद्यालयीन व व्यावसाईक अभ्यासक्रमाकरिता शिक्षण घेणा-या गरजू विद्यार्थ्यासाठी (अनुसूचित जाती/अनुसुचित जमाती /विमुक्त जाती भटक्या जमाती/ इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग इत्यादी प्रवर्गातील) रिक्त जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, जेवण, राहण्याची सोय, सुसज्ज ग्रंथालय, सभागृह, क्रिडांगण, संगणक कक्ष, मनोरंजन कक्ष, जिम इत्यादी सुविधा उपलब्ध असून वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, गणवेश भत्ता, सहल भत्ता व स्टेशनरी भत्ता इत्यादी सोयी सुविधा विनामुल्य असणार आहेत. तरी गरजू…

Read More

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग डागोर (राज्यमंत्री दर्जा) हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार, दिनांक 1 जून 2026 रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह आगमन, राखीव व मुक्काम. मंगळवार, दिनांक 2 जून 2026 रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे सफाई कर्मचारी यांच्या संघटने सोबत बैठक व राखीव. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात, कोल्हापूर येथे हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगांराच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे बाबतच्या अधिनियम २०१३ ची अंमलबजावणी बाबत तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडीअडचणी निवारणाकरीता केलेल्या उपाययोजना संदर्भात आढावा बैठक.…

Read More

*कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या सह पालकमंत्री माधुरी मिसाळ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.* रविवार, दिनांक 31 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता चंदगड येथे आगमन व विविध कार्यक्रमास उपस्थिती, रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह, चंदगड येथे आगमन व राखीव. सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी सकाळी 8 शासकीय विश्रामगृह, चंदगड येथुन कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व नागरिकांच्या भेटीगाठीसाठी राखीव. दुपारी 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन…

Read More

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 10.10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व स्थानिक नेत्यांशी चर्चा. सकाळी 11.15 वाजता पत्रकार परिषद (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर). दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण. *****

Read More

कोल्हापूर, दि.२७ :* कोल्हापूरच्या तांत्रिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती देणाऱ्या प्रस्तावित आय.टी. पार्क (माहिती तंत्रज्ञान पार्क) उभारणीच्या दृष्टीने आज एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा पार पडला. मौजे कसबा करवीर (शेंडा पार्क) येथील एकूण ३४.३६ हेक्टर आर शासकीय जमिनीचा प्रत्यक्ष ताबा आज महसूल विभागाच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांकडे अधिकृतपणे सुपूर्त करण्यात आला. जमिनीची प्रत्यक्ष मोजणी आणि सीमांकन पूर्ण करून हा ताबा देण्यात आल्याने आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या आय.टी. पार्कच्या विकासासाठी कसबा करवीर येथील गट नंबर ५८३ मधील ७.०५ हे.आर., गट नंबर ५८७ मधील १.१२ हे.आर. आणि गट नंबर ५८८ मधील २६.१९…

Read More

कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) :* प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-HH दिनांक 3 जून पासून सुरु करण्यात येत असून संबंधित वाहन चालकांच्या पसंती क्रमांकाचे अर्ज 3 व 4 जून रोजी सकाळी 9.45 ते दुपारी 3 या वेळेत खिडकी क्र. 9 येथे स्वीकारण्यात येतील. पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत शासनाने विहित केलेल्या शुल्कानुसार त्या क्रमांकासाठी विहित असलेल्या मुळ रकमेचा Demand Draft (धनाकर्ष) जोडलेला असणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देवू नये. Demand Draft (धनाकर्ष) काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच…

Read More

कोल्हापूर, दि. २७ (जिमाका) :* मुख्य कार्यकारी अधिकारी, धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांच्या पत्रानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा व मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाचे नामांतर करुन “धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ” असे नाव देण्यास शासनाने दि. २० मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. त्याचबरोबर कल्याणकारी मंडळाचे सभासद होण्यासाठीच्या पात्रतेमध्ये सुधारणा करण्यात आली असून सर्व प्रकारची प्रवासी वाहने चालविणारे बॅजधारक अनुज्ञप्तीधारक चालक यांना मंडळाचे सभासद म्हणून नोंदणी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. कल्याणकारी मंडळाचे मुख्यालय ठाणे येथे कार्यरत असून मंडळाचा पत्ता धर्मवीर…

Read More

कोल्हापूर, दि. २७ (जिमाका) : जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना” सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या योजनेंतर्गत सिंचन सुविधा आणि इतर घटकांसाठी भरीव अनुदान दिले जाणार आहे. योजनेचे प्रमुख घटक आणि अनुदान मर्यादा पुढीलप्रमाणे आहे. नवीन सिंचन विहीर करीता ४ लाख, जुनी विहीर दुरुस्ती करीता १ लाख, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी २ लाख, इनवेल बोअरिंगकरीता ४० हजार, सोलर पंपकरीता ५० हजार, पंप संच (डिझेल/विद्युत) : ४० हजार, ठिबक/तुषार सिंचन : ९० टक्के पर्यंत पूरक अनुदान. एचडीपीई/पीव्हीसी…

Read More

कोल्हापूर, दि. २७ (जिमाका):* एनसीसी ग्रुप मुख्यालय कोल्हापूर यांच्या वतीने व एनसीसी डारेक्टरेट महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली इंटर ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धा (IGSSC)- 2026 चे आयोजन दिनांक 27 ते 29 मे 2026 या कालावधीत छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल, कोल्हापूर येथील शूटिंग रेंजवर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध एनसीसी ग्रुप मुख्यालयांतील गुणवंत एनसीसी कॅडेट नेमबाज या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या 27 मे रोजी महाराष्ट्रातील सर्व एनसीसी ग्रुप मुख्यालयांच्या संघातील प्रत्येकी 5 मुले एनसीसी कॅडेट (फायरर्स) यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक कॅडेटने 0.22 स्पोर्ट्स शूटिंग रायफलमधून 46 राऊंड्स फायर करून आपले नेमबाजी कौशल्य, शिस्त व एकाग्रतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. एनसीसी कॅडेट्समध्ये…

Read More

कोल्हापूर, दि. २७ (जिमाका) : परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली ९ मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये ऑटोरिक्षा / टॅक्सी परवान्यांचे खुल्या धोरणास स्थगिती देण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. ऑटोरिक्षा / टॅक्सी नोंदणीसाठी ज्या अर्जदारांना इरादापत्र जारी करण्यात आले होते, परंतु त्या इरादापत्राची वैधता संपली आहे, अशा प्रकरणांत नोंदणी थांबवण्यात आली होती.* परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई इरादापत्राची वैधता संपलेल्या प्रकरणांमध्ये त्यांना वाहन नोंदणी करिता एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इरादापत्राची वैधता संपलेल्या अर्जदारांनी २५ जून पर्यंत वाहनाची नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांचे तर्फे करण्यात आले आहे.

Read More