
कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 30 मे 2026 रोजी सकाळी 10.10 वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व स्थानिक नेत्यांशी चर्चा. सकाळी 11.15 वाजता पत्रकार परिषद (स्थळ- शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर). दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण.
*****