Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: admin
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील ऐतिहासिक मिरजकर तिकटी येथे हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर यांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, शनिवारी (२८ मार्च) आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाचा लाभ ३००० हून अधिक रामभक्तांनी घेतला, अशी माहिती हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाप्रमुख दिपक देसाई यांनी दिली. भक्तीमय वातावरणात महाआरती शनिवारी दुपारी ठीक १२ वाजता मिरजकर तिकटी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा करण्यात आली. संघटनेच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने आणि भावपूर्ण वातावरणात महाआरती संपन्न झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व भाविकांनी दिलेल्या ‘जय श्री राम’ च्या जयघोषाने संपूर्ण मिरजकर तिकटी परिसर दुमदुमून…
कोल्हापूर दि :27 (जिमाका) इराण,अमेरिका – इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे .तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल – डिझेल,गॅस) आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आ.राजेश क्षीरसागर यांनी केले . जिल्ह्यात गॅस व पेट्रोल टंचाई संदर्भात विविध अफवा पसरलेल्या आहेत.त्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज आढावा बैठक घेण्यात आली . सध्या गॅस व पेट्रोल तसेच डिझेल टंचाईच्या अनुषंगाने नागरिक पॅनिक झाले आहेत. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिक गॅस सिलेंडरसाठी तळपत्या उन्हात तासंन…
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. रविवार, 29 मार्च रोजी सकाळी 7.20 वाजता कोल्हापूर शाहू महाराज टर्मिनस येथे महालक्ष्मी एक्सप्रेसने आगमन व राखीव. सकाळी 8 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 10.30 वाजता हॉटेल स्वागत, परिते ता. करवीर आयोजित रौप्य महोत्सव व उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ : परिते, ता. कागल) दुपारी 12 ते 7 राखीव. सोयीनुसार कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व मुक्काम. (स्थळ : निवासस्थान कागल) सोमवार, 30 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सर्व नागरिकांसाठी राखीव. (स्थळ : निवासस्थान कागल) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे…
कोल्हापूर दिनांक 24-सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून, फेडरेशनच्यावतीने ३ एप्रिल रोजी महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर आणि चर्चासत्र आयोजित केले आहे. सहकारी पतसंस्था क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना, सहकार सम्राज्ञी पुरस्काराने गौरवले जाणार आहे. राज्य फेडरेशनचे महासचिव शशिकांत राजोबा आणि भागीरथी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्यावतीने ३ एप्रिल रोजी कोल्हापुरातील सायबर महाविद्यालयाच्या आनंद भवन सभागृहात महिला मेळावा आयोजित केला आहे. यापूर्वी शिर्डी येथील पतसंस्था फेडरेशनच्या प्रशिक्षण केंद्रात तीन वेळा मेळावे झाले आहेत. त्यानंतर नाशिक तसेच जुन्नर तालुक्यातील…
पल्स वैद्यकीय परिषदेच्या माध्यमातून आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवोन्मेष, संशोधन पुढे येईल. या क्षेत्रात नवनवीन संकल्पना, कार्य करणाऱ्या स्टार्टअप्सलाही परिषदेत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. जगभरातून उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक परिषदेत येणार आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यवस्थेचा पाया अधिक बळकट करणे शक्य होणार आहे. भविष्यातील वैद्यकीय शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहणार नाही, तर तंत्रज्ञानाधारित, संशोधनकेंद्रित आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असणे अत्यावश्यक आहे. आज आरोग्य क्षेत्र झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना केवळ पदवी नव्हे, तर जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची क्षमता देणे ही काळाची गरज आहे. यासाठी काही महत्त्वाचे बदल आवश्यक आहेत. डिजिटल आणि सिम्युलेशन-आधारित शिक्षण, व्हर्चुअल…
तरुणांनी मोबाईलचा वापर करिअरसाठी करावा – जिल्हाधिकारी अमोल येडगे नीम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि छत्रपती प्रमिलाराजे शासकीय सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर रुग्णालय यांच्या सहकार्याने आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने आज, २४ मार्च रोजी ‘आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उद्घाटन सोहळा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे (IAS) यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात झाली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भौतिकशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे आणि उत्कृष्ट संयोजनाचे कौतुक केले.…
कोल्हापूर, दि. 23 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मिशन लक्षवेध योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा प्रतिभावान खेळाडूंसाठी जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्राकरिता निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाचा उद्देश ऑलिम्पिक स्तरावरील १२ क्रीडा प्रकारांमध्ये गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविणे हा असून या योजनेतून क्रीडा प्रशिक्षण, पायाभूत सुविधा, स्पर्धा आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, प्रोत्साहन व करिअर मार्गदर्शन अशा विविध घटकांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. ही योजना त्रिस्तरीय असून राज्यस्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कुस्ती, मैदानी खेळ, वेटलिफ्टिंग,…
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी, आळते व सांगवडे ग्रामपंचायतीना भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी यात्राकर ऐवजी सहाय्यक अनुदान 1 कोटी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून येत्या दोन दिवसात ही रक्कम ग्रामपंचायत खात्यावर जमा होणार आहे. नृसिंहवाडी,आळते,सांगवडे या तीर्थक्षेत्र असणाऱ्या गावाना लाखो भाविक दरवर्षी येत असतात त्यांना मूलभूत सोयी सुविधा देण्यात याव्यात म्हणून ग्रामपंचायतीकडून यात्राकर गोळा केला जात होता.त्यामुळे सदरचा यात्राकर गोळा करण्याऐवजी शासनाकडून सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यातून ग्रामपंचायतींनी भाविकांसाठी लागणाऱ्या सोयी सुविधा पुरविण्याच्या आहेत. त्यानुसार नृसिंहवाडी ग्रामपंचायत 50 लाख 75 हजार आळते ग्रामपंचायत 42 लाख 76 हजार व सांगवडे ग्रामपंचायत 29 लाख रुपये मंजूर करण्यात आले…
भारतीय समाजव्यवस्थेतील जातीभेदाच्या भिंती पाडण्यासाठी आणि शोषित-वंचितांना आत्मभान मिळवून देण्यासाठी ज्या काही मोजक्या ऐतिहासिक घटना घडल्या, त्यात ‘माणगाव परिषद’ हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. २१ आणि २२ मार्च १९२० रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील माणगाव या छोट्याशा गावात ही परिषद संपन्न झाली. या परिषदेला आता १०६ वर्षे पूर्ण होत आहेत. ही परिषद केवळ एक राजकीय सभा नव्हती, तर ती भारतीय लोकशाहीच्या आणि सामाजिक समतेच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता आणि तो पुढे एक सामाजिक क्रांतीचा एल्गार ठरला. दोन युगपुरुष एकाच मंचावर : शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर माणगाव परिषदेचे सर्वात ऐतिहासिक आणि रोमांचक वैशिष्ट्य म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज…
कोल्हापूर दि : 17 (जिमाका) वाढत्या धकाधकीच्या कालखंडात तसेच शासकीय सेवेत असताना कार्यालयीन कामकाजामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या तब्येतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिवशीय मोफत मौखिक आरोग्य व सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांची नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन करून जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सर्व रोग निदान तपासणी व्हॅनला भेट देवून उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला . याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी संजय…